‘धडक’ ही केवळ सुरुवात आहे : जान्हवी कपूर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

‘इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचं कामच तुम्हाला तारतं, हे आई सतत सांगायची. कॅमेऱ्यापासून काहीही लपून राहात नाही.

अभिनेत्री जान्हवी कपूरला एकाच चित्रपटाचा अनुभव असला, तरी तिच्या सध्याच्या घडीला चांगले चित्रपट आहेत. अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता, आई श्रीदेवी यांनी दिलेल्या शिकवणीवरच आपण प्रत्येक निर्णय घेत असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितले

‘धडक’ ही केवळ सुरुवात आहे. मी चांगलं काम केलं की नाही हे सांगायला खूप लोक आहेत. मात्र माझा प्रवास हा आईच्या शिकवणीवरच सुरू आहे, असं जान्हवी कपूर सांगते. ‘तिला जितकी उत्तम अभिनेत्री व्हायचं आहे, त्यासाठी आधी तितकंच उत्तम व्यक्ती व्हावं लागेल,’ असा सल्ला आईनं दिल्याचं ती म्हणते.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीला जाहीर कार्यक्रमांमध्ये सातत्यानं आईशी असणाऱ्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. मात्र, एरवी फारसं न बोलणाऱ्या जान्हवीनं आईशी असणारं नातं आणि तिची शिकवण याबद्दल बराचसा खुलासा केला. ‘इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचं कामच तुम्हाला तारतं, हे आई सतत सांगायची. कॅमेऱ्यापासून काहीही लपून राहात नाही. त्यामुळे कलाकारानं उत्तम अभिनेता वा अभिनेत्री होण्यापूर्वी उत्तम व्यक्ती असणं आवश्यक आहे, हे ती सतत सांगायची. मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. कॅमेऱ्यासमोर उभं राहण्यापूर्वी मी तिची ही शिकवण कायम आठवते आणि मगच पुढचं पाऊल टाकते.

सध्याच्या काळात अभिनेत्रींसाठीही ‘लेडी कबीर सिंग’ प्रकारच्या भूमिका लिहिल्या जाव्यात, असं तिला वाटतं.कलाकारानं उत्स्फूर्त असायला हवं, हे तिचं म्हणणं होतं. कारण, स्पॉटबॉयपासून दिग्दर्शकापर्यंत सगळ्यांच्या प्रयत्नांना न्याय देणं हे कलाकारांच्या हाती असतं. हे विसरता कामा नये.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News