देवेंद्र फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 8 November 2019

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज (८ नोव्हेंबर) रोजी संपत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्टया देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांना दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते.

विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु करतील. सर्वात आधी ते सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तेचं निमंत्रण देऊ शकतात. भाजपाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्या होत्या. महायुतीकडे बहुमताचा १४५ आकडा आहे. पण मुख्यमंत्रिपद समसमान वाटप व्हावं या मागणीवर शिवसेना ठाम आहे तर मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News