'या' अभिनेत्रीला दुहेरी भूमिका करण्याची इच्छा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019
  • बॉलीवूडमध्ये ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूरचे ‘जब वी मेट’, ‘३ इडियट्‌स’, ‘बॉडीगार्ड’सारखे चित्रपट चांगलेच गाजले.

बॉलीवूडमध्ये ‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूरचे ‘जब वी मेट’, ‘३ इडियट्‌स’, ‘बॉडीगार्ड’सारखे चित्रपट चांगलेच गाजले. रुपेरी पडद्यावर काम केल्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे.

नुकताच या शोमध्ये तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या चित्रपटातील भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘चालबाज’ या चित्रपटामधील श्रीदेवींच्या डबल रोलची भूमिका तिला साकारायची आहे.

‘मी ‘चालबाज’ची खूप मोठी चाहती आहे. हा चित्रपट मी ३५ वेळा पाहिला आहे. त्यातील ‘सीता आणि गीता’सारखी डबल रोल करण्याची इच्छा आहे. मला आजपर्यंत अशा भूमिकेसाठी कधीही ऑफर आली नाही’, असे करिना सांगते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News