विद्यार्थ्यांना 'सुपर 30' चित्रपट दाखविण्याचे शिक्षण विभागाचे फर्मान

सुहास सदाव्रते 
Sunday, 21 July 2019

जालना: प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत शिक्षण देणारे गुरूजी आणि तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत उच्च ध्येयाप्रत नेण्याचा अदम्य विश्‍वास देणारा चित्रपट म्हणजे सुपर 30 होय. हीच प्रेरणा ग्रामीण भागातील शिक्षकांनी अन् मुलांनी घ्यावी यासाठी चित्रपट दाखवावा, असे फर्मानच शिक्षण विभागाने दिले आहे, हे विशेष. रविवारी (ता.21) शहरातील चित्रपटगृहात शाळा, शिकवणीवर्गासह पालकांची गर्दी दिसून आली. 

जिल्हा परिषद जालना माध्यमिक शिक्षण विभागाने शनिवारी (ता. 20) गटशिक्षणाधिकारी यांना एक विशेष आदेशच काढले आहे. यात म्हटले आहे की, सत्य घटनेवर आधारित असलेला विद्यार्थी अन् शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. शाळांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्याना चित्रपट दाखविण्यासाठी नियोजन करावे असेही आदेशात म्हटले आहे.

शिक्षक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काय धडपड करतो आणि स्वखर्चाने मोफत शिक्षण देवून 30 विद्यार्थ्यांना सुपर कसा बनवितो हा प्रवास प्रेरणा देणारा आहे. शहरातील चित्रपटगृहाच्या मालकांनी शिक्षण विभागाला याबाबत लेखी निवेदन दिले आहे. खास विद्यार्थ्यांसाठी सवलत दरही ठेवण्यात आले आहे. जिल्हयातील शाळांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवावा असे आदेश देत कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असेही गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान रविवारी (ता.21) शहरातील चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. निलम सिनेमागृहात रामगनर येथील शाळेतील विद्यार्थ्यांची गर्दी होती. शहरातील भाग्यनगर परिसरातील अभिजात कोचिंग क्लासेसने चक्क सर्वच विद्यार्थ्याना सुपर 30 चित्रपटाला नेले आहे. शालेय मुलांमध्ये आत्मविश्‍वास अन् जिद्दीने यश कसे मिळविता येते याचा वस्तुपाठ देणारा हा चित्रपट आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात अंजण घालणारा हा प्रेरणादायी चित्रपट असल्याची प्रतिक्रिया गिरीश राखे यांनी दिली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News