देवळी विधानसभेची उमेदवारी कुणाला?

शेख सत्तार
Tuesday, 11 June 2019
  • मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा: भाजप-शिवसेना कार्यकर्ते उमेदवारीसाठी आग्रही

  • भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे आपणास तिकीट मिळणार, असे गृहीत धरून कामाला लागले आहेत.
  • शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत देशमुख यांनी गावोगावी शाखा स्थापन केल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय भाग घेऊन सदस्य व सरपंच निवडून आणले.
  • वंचित आघाडी, बहुजन समाज पक्ष, आरपीआय किंवा  इतर कोणत्याच पक्षाची सध्यातरी उमेदवारीकरिता हालचाल दिसून येत नाही. 

वर्धा: देवळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा कब्जा असला तरी आमदार रणजित कांबळे यांना पराजित करणे कठीण आहे. या मतदारसंघात भाजप- शिवसेना या दोन्ही पक्षांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु, खासदार रामदास तडस काय निर्णय घेणार, कुणाचे नाव पुढे करणार हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार रणजित कांबळे यांचा मागील २०१४ च्या निवडणुकीत निसटता विजय झाला. अखेर  ९४३ मतांनी आघाडी घेत रणजित कांबळे चौथ्यांदा विजयी झाले. 

२०१४ साली देवळी विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची ठरली होती. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले सहाव्या फेरीपासून भाजपचे सुरेश वाघमारे यांनी मताची आघाडी घेतली होती. १६ व्या फेरीपासून २३ व्या फेरीपर्यंत आघाडी कमी झाली आणि २४ व्या फेरीमध्ये अतिशय कमी मतांनी विजय रणजित कांबळे यांनी विजय मिळविला. यावेळी मोदी लाटेत रणजित कांबळे उतरल्याने या मतदारसंघात त्यांना पराजित करणे कठीण आहे, असे अनेकांचे मत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेला राज्यात अभूतपूर्व यश मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली आहे. हा मतदारसंघ कुणाकडे जाणार यावर सर्वांचे लक्ष केंद्रात झाले आहे. ५०-५० टक्के जागा वाटप भाजप व शिवसेनेचे ठरले असल्याने देवळी मतदारसंघ आमच्या पक्षाकडे असावा, अशी मागणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत इतर विधानसभेच्या तुलनेत कमी आघाडी असली तरी दोन्ही पक्षाला वातावरण पाहता आमचा उमेदवार हमखास विजयी होईल, असे वाटते. 

त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे आपणास तिकीट मिळणार, असे गृहीत धरून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचा फायदा घेत थेट मतदार व कार्यकर्त्या सोबत संपर्क वाढवून त्या भागातील समस्या व कामे करण्यास पुढाकार घेतला आहे. देवळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असावा, याकरिता कार्यकर्ते जोरदार मागणी करीत आहेत. शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत देशमुख हे या विधानसभा क्षेत्रात आधीपासून संपर्कात आहेत. त्यांनी गावोगावी शाखा स्थापन केल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय भाग घेऊन सदस्य व सरपंच निवडून आणले आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. वंचित आघाडी, बहुजन समाज पक्ष, आरपीआय किंवा  इतर कोणत्याच पक्षाची सध्यातरी उमेदवारीकरिता हालचाल दिसून येत नाही. 

या मतदारसंघामध्ये परत सुरेश वाघमारे, गिरीश गोढे, मिलद भेंडे हेसुद्धा उमेदवारी मिळण्याकरिता प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतर्फे  जिल्हाप्रमुख बाळू शहागडकर आणि अनंत देशमुख यांनी दावेदारी केली आहे. हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार त्यावर पुढील निवडणुकीचे वातावरण व चित्र स्पष्ट होईल. पक्षात कार्यकर्त्यांना यावेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात एकायला मिळत आहे. 

खासदार तडस हे या मतदारसंघात काय निर्णय घेणार? कुणाचे नाव पुढे करणार? हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्या पक्षाला भाजप किंवा शिवसेनेला उमेदवारी मिळणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News