सेक्ससाठी नकार म्हणून कपडे उतरवून बारमध्ये मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • लोक तिच्यावर ग्राहकांसोबत शरिरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करत आहेत.
  • लोक तिच्यावर ग्राहकांसोबत शरिरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करत आहेत.

हैदराबाद: येथील बेगमपेठ परिसरातील एका बारमध्ये पोटाची खळगी भागवण्यासाठी ती तरुणी काम करत होती. तेव्हापासून तेथील लोक तिच्यावर ग्राहकांसोबत शरिरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती करत आहेत. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या पाच सहकाऱ्यांनी कपडे काढून तिला मारहाण केली. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश होता. पंजागुट्टा पोलिसांनी याप्रकरणी चार महिलांना अटक केली आहे. तर यामधील मुख्य आरोपी फरार आहे. त्याला अटक करण्याचे सर्व प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'काही दिवसांपासून बार व्यवस्थापनाने ग्राहकांना बारमध्ये येऊन शरिरसंबंध ठेवण्याची ऑफर देण्यास सुरुवात केली आहे' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकऱणी कारवाई करत मारहाण करणाऱ्या चार महिलांना अटक करण्यात आली आहे. तसंच तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेंदर रेड्डी यांनी घटनेचा सविस्तर अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News