'डेनीम' है सदा के लिए...

अर्चना राणे-बागवान
Wednesday, 30 January 2019

फॅशन म्हटलं की डेनीम आलेच. डेनीमला सोडून आपण फॅशन, स्टाईलचा विचार करूच शकत नाही. डेनीम दिसायला जितकं सोबर, स्टायलिश लूक देत; तितकंच ते वापरण्यासाठीही कम्फर्टेबल वाटतं. शिवाय त्याचा कितीही वापर केला तरी ती जुनी, फेकून देण्यासारखी वाटत नाही. तिचा मळकट लूक पण कॅरी करता येतो. त्यामुळे प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये डेनीमची एखादी जोडी दिसतेच. मग तो शर्ट असो, कुर्ती, शॉर्टस, बॅग, शूज... डेनीमला नेहमीच पसंती मिळते.

डेनीम नेहमीच ब्रॅंडेड असावी. ब्रॅंडेड डेनीमचेच फिटिंग व्यवस्थित असते. तसेही कुठल्याही आऊटफिटसाठी ‘फिटिंग’ महत्त्वाची ठरतेच. डेनीम जीन्समध्येही काही प्रकार येतात. त्यात हाय वेस्ट जीन्स आणि लो वेस्ट जीन्सबद्दल तुम्हाला सांगायला नको. हाय वेस्ट जीन्सबरोबर क्रॉप टॉप वापरता येतात. लो वेस्ट जीन्समध्ये बऱ्याचदा ‘शो’ होत असल्याने ही जीन्स वापरण्याचं डेअरिंग सहसा कोणी करताना दिसत नाही. पण या जीन्सवर शर्टस मस्त दिसतात.

स्किन फिट जीन्स
हिपपासून अँकलपर्यंत ही जीन्स स्किन फिट असते. मुलींची पहिली पसंती असलेल्या या जीन्स टाईपवर कुठलीही कुर्ती, शर्ट शोभून दिसतो. 

सिगरेट लेग जीन्स
हा स्ट्रेट लेग जीन्सचाच प्रकार. यावर नी लेंथ कुर्ती शोभून दिसतात. ज्यांना स्किन फिट आवडत नाहीत त्यांनी या ट्राय करायला हरकत नाही. ह्या जीन्स काहीशा लूज असतात.

बूट कट जीन्स
हिपपासून अँकलपर्यंत ही जीन्स थोडी लूज असते. अँकलजवळ जरा जास्तच लूज. ट्रेकिंग किंवा प्रवासात या जीन्स सोयीस्कर ठरते.

फ्लेयर्ड जीन्स
ही जीन्स गुडघ्यापर्यंत टाईट आणि त्यानंतर पुढे लूज असते. बेल बॉटमसारखी. 

  • इन डेनीम स्टाईल 
  • एम्ब्रॉयडर्ड स्लिम जीन्स
  • सिगरेट लेग जीन्स
  • लूज फिट जीन्स
  • फेदर ट्रिम जीन्स
  • रिबन जीन्स
  • साईड स्ट्रीप जीन्स
  • प्रिंटेड जीन्स

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News