पदवीधर युवकांना बेरोजगार निर्वाह भत्ता देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019
  • बेरोजगार युवकांना 'बेरोजगार निर्वाह भत्ता' शासनाच्या वतीने देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
  • मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंन्ट या विद्यार्थी संघटनेच्या वतीने निवेदन करण्यात आले. 

उदगीर: महाराष्ट्रात आजच्या घडीला अनेक पदवीधर युवकांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे नोकरी नसल्यामुळे ते बेरोजगार आहेत. त्या बेरोजगार युवकांना 'बेरोजगार निर्वाह भत्ता' शासनाच्या वतीने देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंन्ट या विद्यार्थी संघटनेच्या वतीने  'महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय' यांनी पदवीधर आमदार सतीश चव्हाण साहेब आले असता त्यांना निवेदन करण्यात आले. 

याप्रसंगी संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव,उपाध्यक्ष रविकिरण बेलकुंदे,तालुकाध्यक्ष नवनाथ कोकणे,तालुकाउपाध्यक्ष विजय कस्तुरे,कार्याध्यक्ष रितेश बिरादार, अजय कस्तुरे, तिरुपती पवार, दाऊद पठाण, कृष्णा गायकवाड, पांडुरंग बिरादार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
           

यावेळी संस्थेचे सचिव तथा माजी आमदार प्रा.मनोहर पटवारी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजयभाऊ बनसोडे, प्राचार्य.डाँ.आर.आर.तांबोळी, उपप्राचार्य राजकुमार मस्के, स्वा.रा.ती.म.विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य डाँ. बी.डी. करंडे, प्रा.एस.एस.पाटील तालुकाअध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे आदी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News