शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावा; शिक्षक परिषद सदस्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली.

नगर - प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. मंत्री शेलार यांनी प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक विभाग) संस्थापक अध्यक्ष संजय केळकर यांनी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न शिक्षणमंत्र्यांसमोर मांडले. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्यालयीन मंत्री भगवान घरत, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी देण्यात यावी, मुलींच्या स्वच्छतागृहांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, सादिल अनुदान सर्व शाळांच्या खात्यांवर तत्काळ वर्ग करावे, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आदींची रिक्त पदे तत्काळ भरावीत, विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News