सभापतींवर अविश्‍वास ठराव?; अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अविश्‍वास ठराव मांडणार असल्याचे जाहीर

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करून अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या वेळी सभागृह तहकूब केल्याने विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अविश्‍वास ठराव मांडणार असल्याचे जाहीर केले. सभापतींच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडल्यास रामराजे नाईक निंबाळकर यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्‍यता आहे.

अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून अर्थसंकल्पातील गोष्टी ट्‌विट केल्या जात होत्या. याचा अर्थ याअगोदरच अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांच्या सोशल मीडिया हॅंडल करणाऱ्या टीमच्या हाती लागला होता, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News