दीपिकाच आहे या चित्रपटासाठी परफेक्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे अभिनेता सोनू सूदने वर्षभरापूर्वीच घोषित केले होते.
  • या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सोनू म्हणतो, ‘या चित्रपटाची कथा आता तयार झाली आहे.

बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे अभिनेता सोनू सूदने वर्षभरापूर्वीच घोषित केले होते.

या वर्षाच्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सोनू म्हणतो, ‘या चित्रपटाची कथा आता तयार झाली आहे. बराच अभ्यास करून या चित्रपटाची कथा निश्‍चित झाली आहे.

आणि दीपिका पादुकोण ही पी. व्ही. सिंधूच्या भूमिकेसाठी योग्य आहे. कारण बॅटमिंटन खेळाचा तिला अभ्यास आहे. आम्ही या चित्रपटासाठी दीपिकाला विचारलेदेखील आहे.’ शिवाय पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची भूमिका सोनूला करायची आहे. पण दीपिका यासाठी होकार कळवणार का? हे महत्वाचं आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News