दोन सख्या बहिणी झाल्या पीएसआय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019

जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रायबाग तालुक्‍यातील यल्पारट्टीतील दोघी सख्ख्या बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. दीपाली शिवानंद गोडोडगी आणि रुपाली शिवानंद गोडोडगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा कौटुंबिक जीवनापासून ते पीएसआय पदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा असाच आहे.

बेळगाव  : जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर रायबाग तालुक्‍यातील यल्पारट्टीतील दोघी सख्ख्या बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली आहे. दीपाली शिवानंद गोडोडगी आणि रुपाली शिवानंद गोडोडगी अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा कौटुंबिक जीवनापासून ते पीएसआय पदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा असाच आहे.

शेतकरी शिवानंद गोडोडगी यांना तीन आपत्ये असून दीपाली व रुपाली यांनी पोलीस खात्यात पदार्पण केले असून मुलगा शेती करतो. या दोघींनी ग्रामीण भागातील शाळेतच आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जमखंडीतील बीएलडीई संस्थेमध्ये पदवीपूर्व (पीयुसी) शिक्षण पूर्ण केले. पुढे चिक्‍कोडीतील बसवप्रभू कोरे पदवी महाविद्यालयामध्ये बीबीए पदवी मिळविली. त्यानंतर दोघी बहिणींनी स्पर्धात्मक परीक्षा देण्याची तयारी केली होती. समाजकल्याण खाते आणि इतर मागास खाते यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात त्यांनी भाग घेतला. 

त्यानंतर जैस या संस्थेत नऊ महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण संपल्यानंतर दोघींनीही धारवाडमध्ये भाड्याचे घर घेऊन त्याठिकाणी कठोर परिश्रम, जिद्द आणि सतत अभ्यास केल्याने त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणे शक्‍य झाले. आपल्या या यशाला आई-वडिलांचा आशीर्वाद कारणीभूत असल्याचे त्यांचे मत आहे. मुला-मुलींमध्ये कोणताही भेदभाव करु नये. शिक्षणाची आवड असलेल्या मुलींना प्रोत्साहन दिल्यास त्याही चांगल्या पदापर्यंत पोहचू शकतात, हेच आपल्या दोन्ही मुलींनी सिध्द करुन दाखविले आहे, असे मत त्यांचे वडील शिवानंद यांनी व्यक्‍त केले.

एकाच घरातील दोघी सख्ख्या बहिणी पोलिस खात्यात अधिकारीपदावर येणे ही कौतुकास्पद बाब आहे. याचे अनुकरण इतर तरूणींनी करावा. महिलांसाठी हा आदर्शच आहे.
-सीमा लाटकर, पोलिस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News