दीपक आणि निशिगंधा पुन्हा एकदा रुपेरी पद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी जोडी म्हणजे अभिनेता दीपक देऊळकर आणि अभिनेत्री निशिगंधा वाड.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि गुणी जोडी म्हणजे अभिनेता दीपक देऊळकर आणि अभिनेत्री निशिगंधा वाड.

निशिगंधा ‘कुलवधू’, ‘दास्तान’, ‘ससुराल सिमर का’सारख्या अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘तुजवीन सख्या रे’ यांसारख्या मालिकांमध्ये दीपक यांनी काम केले. आता ही जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या वेळी मात्र हे दोघेही कलाकार म्हणून नाही, तर निर्माते म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘श्री गुरुदेव दत्त’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दत्तगुरूंचा संपूर्ण प्रवास या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. लेखनाची जबाबदारी स्वामी बाळ यांच्यावर असून, ही मालिका १७ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News