ठरल! आदित्य ठाकरे मुख्यमंत्री; तर रोहित पवार उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 October 2019

मुंबई: राज्याच्या राजकारणात चार दशकांपासून स्वत:चा दबदबा कायम ठेवणाऱ्या पवार आणि ठाकरे घराण्यांच्या मिलीजुली सरकारची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मुंबई: राज्याच्या राजकारणात चार दशकांपासून स्वत:चा दबदबा कायम ठेवणाऱ्या पवार आणि ठाकरे घराण्यांच्या मिलीजुली सरकारची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवसेनाप्रमुख  दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री तिसऱ्या पिढीत थेट सत्तेची सहकारी होणार असल्याचा दावा केला जात आहे.  

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास आदित्य ठाकरे मुख्यमंत्री; तर रोहित पवार उपमुख्यमंत्री होण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. जागा वाटप करताना भाजपने युतीधर्म पाळला नाही.

अर्ध्या-अर्ध्या जागा वाटप न करता शिवसेनेला कमी जागा दिल्याने आधीच शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. त्यात आता निकालानंतर युतीला अपेक्षेप्रमाणे महाजनादेश मिळाला नाही. त्यातच शिवसेनेचे संख्याबळही कमी झाले आहे. भाजपचे संख्याबळ १०५ आहे. यामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची बेरीज करून त्यांचे संख्याबळ १५४ होते. भाजप-अपक्ष आणि इतर मिळूनही सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास १३१ संख्याबळ होत आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News