साक्षी वेबसीरिजमध्ये पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

एकता कपूरच्या ‘एम.ओ.एम. मिशन ओवर मार्स’ या वेबसीरिजमध्ये ती वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे.

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री साक्षी तंवर. साक्षीने हिंदी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्ये काम केले.

आता ती वेबसीरिजकडे वळली आहे. एकता कपूरच्या ‘एम.ओ.एम. मिशन ओवर मार्स’ या वेबसीरिजमध्ये ती वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. ऑल्ट बालाजीच्या मालिकेचे कथानक चार महिला वैज्ञानिकांभोवती फिरणारे आहे.

ती म्हणते, ‘मला या वेबसीरिजसाठी विचारण्यात आले, तेव्हा मी लगेच होकार दिला. याची कथा मला फार आवडली.’ या सीरिजमध्ये साक्षीसह मोना सिंग, निधी सिंग, पलोमी घोष दिसणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News