प्रिय, जितेंद्र आव्हाड. मी, मांत्रिक नाही 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 November 2019

"प्रिय, जितेंद्र आव्हाड. मी, मांत्रिक नाही" असं कॅप्शन देऊन फॅशन डिझायनर फिरोज शाकीर यांनी मंगळवारी (ता.19) एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओमध्ये शाकीर यांनी आपले मत व्यक्त केले आहे

"प्रिय, जितेंद्र आव्हाड. मी, मांत्रिक नाही" असं कॅप्शन देऊन फॅशन डिझायनर फिरोज शाकीर यांनी मंगळवारी (ता.19) एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओमध्ये शाकीर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. 

"आशिष शेलार हे सध्या एका मांत्रिकाच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, त्यांनी सांगितलं असेल अदृष्य शक्ती येईल. मात्र, या गोष्टीवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, स्वत:चे विचार आणि विश्वासावर आम्ही पुढे जातो." असे मत तीन दिवसापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते.
 

त्यानंतर काल (ता.18) ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विट हॅडेल वरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यात आशिष शेलार एका मांत्रिकासोबत दिसत आहेत. त्या फोटोसोबत कॅप्शन देण्यात आल होत. "आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसापूर्वी म्हटलं होत आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत त्याचा पुरावा." अस ट्विट मध्ये म्हटलं आहे. 

पाहा शाकीर काय म्हणाले
 

'जय महाराष्ट्र' माझ नाव फिरोज शाकीर. मी गेली 40 वर्षांपासून फॉशन डिझायनरचं काम करत आहे. बॉलीवुडच्या अनेक निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासोबत मी  काम केले आहे. सलमान खान यांच्या "बडा साहब" या चित्रपटात मी काम केले आहे. मला फोटोग्राफी फार आवडते. हिंदू, सोफीया, शिया, ख्रिश्चन यांचे विचार आणि संस्कृती यांचे अनेक फोटो देखील मी काढले आहेत. 10 हजार पेक्षा अधिक फोटोंची साठवणूक बझनेट, ब्लॉगस्पॅट, फिकर डॉट कॉमवर केली.    

 

गेल्या अनेक वर्षापासून मी आशिष शेलार यांचा शेजारी आहे. वांद्रेत आशिष यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. सुरुवातीला आशिष शेलार यांच्या परिवाराचे अनेकदा डॉक्युमेंटिंग केलं आहे. याबाबत आशिष यांना माहित नव्हतं. ते खूप चांगले शेजारी आहेत. माझा अपघात झाला होता त्यावेळी त्यांनी मला खूप मदत केली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.  

मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे. जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे मी खूप आश्चर्यचकीत झालो. त्यांनी माझी ओळख पटवुन न घेता मला मांत्रिक घोषित केले. जितेंद्र यांनी गुगल वर माझे नाव टाकले असते तर त्यांना माझ्याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असती. तुम्ही या विरोधात काही अॅक्शन घेणार का? अशी विचारणा काल मला अनेक वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आली. मात्र, मी अॅक्शन घेणार? मी नेहमी चांगूलपणावर विश्वास ठेवतो. आपण माणस चांगुलपणावर विश्वास ठेवू आपल्यासोबत चांगलच होत. मला फक्त माझी बाजू मांडायची होती त्यामुळे मी हा व्हिडीओ तयार केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News