माफ कर... दुर्दैवी बापाला

मेघना जाधव, सातारा
Saturday, 12 October 2019
  • बाळा मी तुला स्वातंत्र्य दिल होतं ते विचारांचं, शिकण्याचं आणि आनंदी जगण्याचं
  • माझ्या अब्रूची लत्करं अशी वेशीवर टांगण्याचं नाही, माझा विश्वास तोडण्याच नाही..!

बाळा आपण एकाच घरात राहत असून मी तुझ्याशी पत्राद्वारे संवाद साधतोय यासारखी दुसरी शोकांतिका नाही; पण मला आज जे काही बोलायचंय ते तुझ्यासमोर मांडण्याचं सामर्थ्य आता माझ्यात उरल नाही, ते मी पत्राद्वारेच सांगू शकतो त्यासाठीचा हा खटाटोप. आतापर्यंत मी सगळ्यांना अगदी ओरडून सांगायचो "माझी मुलगी माझा अभिमान आहे." पण काल चुकून तुझ्या मोबाइल मध्ये डोकावलो आणि क्षणात अविश्वास, अपमान, क्रोध, दुःख आणि कित्येक भावना मनात दाटून आल्या. 

कधीच न पुसली जाणारी आयुष्यभर तो दुःखात भिजत राहीन अशी आसव डोळ्यात दाटली. बाळा मी तुला स्वातंत्र्य दिल होत ते विचारांचं, शिकण्याच आणि आनंदी जगण्याचं माझ्या अब्रूची लत्कर अशी वेशीवर टांगण्याचं नाही, माझा विश्वास तोडण्याच नाही..! तुझ्या मोबाईल मध्ये असणारे ते न पहावणारे फोटो, प्रेमाच्या नावाखाली मारलेल्या त्या मर्यादेबाहेरच्या गप्पा वाचून किती वेदना झाल्या असतील. माझ्या मनातल्या त्या हळव्या बापाला हे शब्दात मांडण कठीण आणि तुझ्यासारख्या शील नसलेल्या मुलीला ते समजणं तर त्याहूनही कठीण अगदीच अशक्य. होय शील नसलेल्या..!

आजपर्यंत आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी एवढंच काय तुझ्या कॉलेज मधील शिक्षकांनी नको त्या गोष्टी माझ्या कानावर घातल्या पण माझ्यातल्या त्या आंधळ्या बापाने मुलीवर असणाऱ्या प्रेमाखातर आणि विश्वासामुळे कधी त्याकडे डोळसपने पहिलेच नाही. मुली आजपर्यंत कधीही न हरलेल्या या मनाला आज तू बाप म्हणून हरवलस. एक बाप म्हणून संस्कार देण्यात मीच कुठेतरी कमी पडलो. असेल, कदाचित चुकलो बाई चुकलो पण करणार तरी काय बेटा.

प्रत्येक बापाला वाटत आपल्या राजकुमारीने सुखात राहावं, आनंदात जगावं आणि स्वत:साठी का होईना पण लढावं अगदी विजय मिळेपर्यंत..! आज घराबाहेर पडल्यावर समाजातील प्रत्येक नजर जेव्हा या असहाय्य, हरलेल्या बापाकडे बघेल ना तेव्हा हा बाप अगदी क्षणाक्षणाला मरेल. जमलं तर माफ कर या दुर्दैवी बापाला. आपला हा शेवटचा संवाद कारण मुलीन केलेला विश्वासघात सहन करण्यापेक्षा मी आनंदान मरण पत्करेन, माझ्यातला बाप तेव्हाच मेला जेव्हा मी तुझ्या मोबाइल मध्ये डोकावलो आता राहिलाय फक्त आसवांच्या गर्तेत अडकलेला दुःखी आत्मा 

तुझाच,
बाबा
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News