दयानंद महाविद्यालयात "प्लास्टिक मुक्ती" व "स्वच्छता ही सेवा" अभियान संपन्न

चंद्रकांत फड
Sunday, 6 October 2019
  • महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेचा अभिनव उपक्रम
  • राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा "प्लास्टिक मुक्त शहर, स्वच्छ शहर व सुंदर शहर करण्याचा संकल्प

लातूर - येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त दि. 02 ऑक्टोबर रोजी "FIT INDIA PLOGGING RUN" या रॅलीचे आयोजन करून 'स्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात आले.

प्रारंभी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके व प्रा. विठ्ठल जाधव यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 

यावेळी उपस्थित प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना 'स्वच्छता ही सेवा' आणि प्लास्टिक मुक्तीची शपथ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. साईनाथ उमाटे यांनी दिली. 
तद्नंतर प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. अशोक शेलगेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील रॅली राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दयानंद गेटपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या भाजी मंडई परिसरातून काढण्यात आली. या रॅली दरम्यान स्वयंसेवकांनी त्या परिसरातील स्वच्छतेसोबतच प्लास्टिक आदि एकत्रित, संकलित करून प्लास्टिक मुक्त शहर, स्वच्छ शहर व सुंदर शहर बाबतची शपथ घेतली.

सदर रॅलीत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. साईनाथ उमाटे, पर्यवेक्षक प्रा. सुभाष मोरे, प्रा. विठ्ठल जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अक्षय पवार, प्रा. अजय चव्हाण, प्रा. एस.  एस. जाधव, प्रा. दिपक वेदे यांच्यासह रासेयोच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News