पंकज ज्या दिवशी भेटतो, त्या दिवशी आमचा सण!

परशुराम कोकणे 
Thursday, 15 August 2019

ज्या वेळी पाठीवर हात ठेवून त्याचा आधार घ्यावासा वाटतो, त्या वेळी त्याची प्रकर्षाने जाणीव होते. मी त्याला फोनद्वारे बोलून माझं मन हलके करते. त्याची खुशाली विचारून घेते. तो वर्षातून एकदाच येतो. तो आला की आमच्यासाठी एखाद्या सणासारखे वातावरण निर्माण होते. रक्षाबंधनाच्या सणाला मी दरवर्षी तो जिकडे पोस्टिंगला आहे, तिकडे राखी पाठवते.

सोलापूर : माझा भाऊ पंकज वर्षातून एकदा घरी येतो. तो घरी आला की सणासारखा उत्साह असतो. देशाच्या सेवेसाठी कार्यरत असल्याने रक्षाबंधन, भाऊबिजेला आमची भेट होत नाही. त्याची जिथे पोस्टिंग आहे, त्या ठिकाणी मी राखी पाठवते. देशाच्या संरक्षणासाठी तो सैन्य दलात कार्यरत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे पोलिस आयुक्तालयातील कनिष्ठ श्रेणी लिपिक मीना कोले यांनी सांगितले.

स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने सकाळने कोले यांच्याशी संवाद साधला. सौ. कोले म्हणाल्या, सैन्य दलातील सेवा खडतर असते. समोर येईल ती ड्यूटी पार पाडावी लागते. माझा भाऊ पंकज केनलवाड (मूळ गाव गादेवाडी, वायगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) हा 2004 पासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. आजपर्यंत त्याने जम्मू-काश्‍मीर, श्रीनगर, झारखंड येथे सेवा बजाविली आहे. सध्या तो गुजरातमध्ये आहे. त्याच्या आठवणीशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. टीव्हीवरील सैनिकांच्या बातमी पाहून आम्ही काळजीने त्याला फोन करतो. प्रत्येक राखी पौर्णिमे, भाऊबीजला तो माझ्याकडे येऊ शकत नाही. त्या दिवशी त्याची फार आठवण येते. तो आमच्या घरातील कर्ता, प्रमुख. आज तो देशाच्या संरक्षणासाठी सैन्य दलात असल्याचा आम्हाला फारच अभिमान आहे. त्याचे लग्न झाले असून पत्नी आणि एक मुलगा कधी सोबत तर कधी गावाकडे असतात. एक मुलगा शिक्षणासाठी इकडे आहे. त्याच्या मुलांना देखील वडील देशसेवा करत असल्याचा गर्व आहे. 

ज्या वेळी पाठीवर हात ठेवून त्याचा आधार घ्यावासा वाटतो, त्या वेळी त्याची प्रकर्षाने जाणीव होते. मी त्याला फोनद्वारे बोलून माझं मन हलके करते. त्याची खुशाली विचारून घेते. तो वर्षातून एकदाच येतो. तो आला की आमच्यासाठी एखाद्या सणासारखे वातावरण निर्माण होते. रक्षाबंधनाच्या सणाला मी दरवर्षी तो जिकडे पोस्टिंगला आहे, तिकडे राखी पाठवते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News