"स्त्री"च्या आयुष्यातील अंधार

उज्वला सुधीर 
Friday, 14 June 2019

दूर करा माझ्यावरची ती चकाकती झगमग, हटवा माझ्यावरून तो प्रकाशाचा झोत. नका झळझळवू माझं अस्तित्व, माझं असणं असं दैदित्यमान प्रकाशाच्या सुवर्ण शलाकांनी, नका भासवू मला प्रकाशाचा दिव्य लोलक मी एक मानव यत्किंचित मानव एक साधारण मनुष्य हीचं असू द्या माझी ओळख. असामान्य बिमान्य काही नाही. इतर सर्व मानव प्राण्यांसारखचं माझंही मन, भावना इच्छा, आकांक्षा मलाही लागू सर्व सजिवांसारखेचं जन्म, मृत्यू, सुखदुःखाचे वेढे. मी ही अशीच सगळ्यांसारखी, सगळ्या गुणदोषांची गोळाबेरीज...! 

म्हणून म्हणते हटवा खरचं माझ्यावरच्या त्या लकाकणार्‍या नजरा माझ्या पिच्छा करणार्‍या, मला डोळ्यानंच पिऊन घेणार्‍या, माझा सतत पाठलाग करणार्‍या , माझ्यावर हरघडी पहारा ठेवणार्‍या .. नको नकोच मला हा असा अक्षय प्रकाश मला दडपवून टाकणारा.

कोणताचं मला हवाय माझा अंधार, माझ्या हक्काचा अंधार मला गुडूप कुशीत दडवून ठेवणारा अंधार प्रकाशाच्या तेजातून मला अंधाराच्या थंड गुहेत घट्ट मिटवून टाकणारा अंधार सारं जग, सार्‍या जाणीवा, सार्‍या इच्छा आकांक्षात मिटवून निरव निस्तब्ध शांती देणारा अंधार उजेड टोचणारं नाही.

खुपणार नाही असा अंधारकडा असलेला प्रकाशच माझ्या वाट्याला यावा मला असा उजेड खरचं नकोय जिथं मला माझा अंधार रिचवता येणार नाही. माझे दुःख, माझ्या वेदना, माझे अश्रू यांना खळाळून वहावता येणार नाही उलट असा "अंधारझरा" माझ्याही वाट्याला यावा, जिथे माझी मीच असेन. कुठल्याही प्रतिबिंबाशिवाय. कोणत्याही सावली शिवाय. फक्त मी ! माझा आक्रोश रिचवून घेणारा अंधाराचा रांजण माझ्याही वाट्याला येवोचं.

जीव घेणारा, जीव देण्यास बाध्य करणारा अलौकिक प्रकाश मला खरचं नकोय. एवढं प्रकाशाचं अथांग अवकाशही नको जिथं मला आर्त हाक द्यावी लागेल अंधार.... अंधार म्हणून सामान्य, सहज उजेडाचा कवडसा, अंधाराला उजेडात परावर्तीत करणारा प्रकाशपुंजका, उजेडाचं महत्व, अंधाराची अनिवार्यता समजावू शकेल एवढी पणतीही माझ्या वाट्याला आली तरीही मी खूश असेन. सुखी समाधानी असेल. पण या सार्‍या भावनेचे बाष्पीभवन करणारा शुष्क, कोरडा, प्रखर प्रकाश मलाच काय  या जगात कुणाच्याही वाट्यास नियतीने पेरू नये.... !
चुकूनही ...!! एवढेचं....!!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News