त्यांना शिक्षणापेक्षा भोजनाची भ्रांत; सहा ते आठ महिने शाळेला सुट्टी

मंगेश शेवाळकर
Monday, 1 July 2019

हिंगोली: नाडीपरीक्षा करणे या परंपरागत व्यवसायासाठी गावोगाव भटकंती करावी लागते. शासनाने एकीकडे प्राथमिक शिक्षणावर कोटी रुपये खर्च करण्याचे धोरण ठरवलं मात्र, दुसरीकडे पालावर शाळा कधी भरणार असा प्रश्न देवीसिंग चितोडिया यांनी उपस्थित केला. तर लहान मुलांनी शाळा सरकारी आहे का असा प्रश्न करून शिक्षणापेक्षा भोजनाची भ्रांत असल्याचे बोलण्यातून दाखवून दिले.

हिंगोली: नाडीपरीक्षा करणे या परंपरागत व्यवसायासाठी गावोगाव भटकंती करावी लागते. शासनाने एकीकडे प्राथमिक शिक्षणावर कोटी रुपये खर्च करण्याचे धोरण ठरवलं मात्र, दुसरीकडे पालावर शाळा कधी भरणार असा प्रश्न देवीसिंग चितोडिया यांनी उपस्थित केला. तर लहान मुलांनी शाळा सरकारी आहे का असा प्रश्न करून शिक्षणापेक्षा भोजनाची भ्रांत असल्याचे बोलण्यातून दाखवून दिले.

हिंगोली शहरालगत खटकाळी भागांमध्ये आयुर्वेदिक जडीबुटी देणारे राजस्थानातील नाडी परिक्षा करणाऱ्या गावकऱ्यांचे यांचे पाल उभे राहिले आहेत. या भागात सुमारे सहा ते सात ठिकाणी पाल टाकून हे राजस्थानी नागरिक राहत आहेत. दिवसभर नाडीपरीक्षा करून जडीबुटी देणाऱ्या वदु लोकांचा उदरनिर्वाह या जडीबुटी वर चालतो. पालावर बागडणारे चिमुकली मात्र शाळा नसल्यामुळे आनंदाने खेळत होती. 

दहा ते बारा लहान मुले या ठिकाणी आहेत. आपण शाळेत जाणार का? या प्रश्नावर मात्र या मुलांनी सरकारी शाळा आहे का? असा प्रश्न उपस्थित करून भोजन दिले जाते का? याची माहिती घेतली. त्यामुळे शाळेपेक्षा पोटाची खळगी कशी शमवावी असा प्रश्न या मुलांना भेडसावत असल्याचे दिसून आले आहे. 

यासंदर्भात राजस्थानातील देवीसिंग चितोडिया यांनी सांगितले की, नाडीपरीक्षा करणे हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे मूळचे राजस्थान मध्ये राहणारे असलो तरी उदरनिर्वाहासाठी भटकंती करावी लागते. गावाकडे शिधापत्रिका आहे. मात्र शिधापत्रिकेचा या ठिकाणी उपयोग होत नाही लहान मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे भटकंतीच्या काळामध्ये सहा ते आठ महिने मुलांची शाळेला सुट्टी असते त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. 

मुलांना शिक्षण घेऊन मोठे करण्याची इच्छा असली तरी नवीन ठिकाणी गेल्यानंतर लवकर शाळेत घेतले जात नाही, तर भटकंती करणारी मुले असल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला जातो. त्यामुळे इच्छा असूनही मुलांना शिक्षण देता येत नाही. शासनाने प्राथमिक शिक्षणासाठी विविध योजना हाती घेतल्या. मात्र भटकंती करणारा समाज आजही शासनाच्या योजनांपासून उपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News