स्वत:ची फसवणूक झाली म्हणून त्याने घातला देशभरात १,०५० जणांना गंडा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

‘तो’ रोजगाराच्या शोधात होता; पण काही लोकांनी त्याची फसवणूक केली. हे शल्य बोचले आणि त्यानेही मग हाच कित्ता गिरवायला सुरवात केली. स्वत:ची ‘महा-ई-सेंटर’ नावाने फेक वेबसाइट बनविली. ‘डोमेन नेम’ही खरेदी केले अन्‌ एक-दोन नव्हे, देशभरातील तब्बल १,०५० जणांना गंडा त्याने घातला. फेक वेबसाइटद्वारे ‘ईझी बिल गेटवे’च्या माध्यमातून त्याने लाखो रुपये हडपले. फसवणुकीचा फंडा देशातील नऊ राज्यांत मोठ्या प्रमाणात फोफावला. जम्मू-काश्‍मीर सोडल्यास असे एकही राज्य नाही जिथे त्याने फसवणूक केली नाही. २०१७ मध्ये तो पकडला गेला.

‘तो’ रोजगाराच्या शोधात होता; पण काही लोकांनी त्याची फसवणूक केली. हे शल्य बोचले आणि त्यानेही मग हाच कित्ता गिरवायला सुरवात केली. स्वत:ची ‘महा-ई-सेंटर’ नावाने फेक वेबसाइट बनविली. ‘डोमेन नेम’ही खरेदी केले अन्‌ एक-दोन नव्हे, देशभरातील तब्बल १,०५० जणांना गंडा त्याने घातला. फेक वेबसाइटद्वारे ‘ईझी बिल गेटवे’च्या माध्यमातून त्याने लाखो रुपये हडपले. फसवणुकीचा फंडा देशातील नऊ राज्यांत मोठ्या प्रमाणात फोफावला. जम्मू-काश्‍मीर सोडल्यास असे एकही राज्य नाही जिथे त्याने फसवणूक केली नाही. २०१७ मध्ये तो पकडला गेला. त्यावेळी विविध राज्यांच्या पोलिसांची रांगच त्याला पुन्हा अटक करण्यासाठी उभी होती.

ही कहाणी आहे शेखर पोद्दार या तरुणाची. जेमतेम बत्तीस वर्षे वय. तो मूळ मध्यप्रदेशातला; पण नागपूरच्या जरीपटका भागात तो राहत होता. रोजगाराच्या शोधात तो असताना फसवणुकीचा मोठा फटका बसला. स्वत: फसला गेल्याने मग त्याने लोकांना फसविण्याचा ‘उद्योग’ सुरू केला. सुरवातीला नागपूरला तो राहत असलेल्या एका कॉलनीत ओळख बनविली, लोकांचा विश्‍वास संपादन केला. त्यांची बिलासोबत इतर ऑनलाइन कामे करून देण्याचे सांगून पैसे घ्यायचा. पैसे स्वत:साठी वापरून लोकांना थापा मारायचा व दुसऱ्या भागात राहण्यासाठी जायचा. तिथेही हीच कृती तो करायचा. पुढे याच ‘उद्योगा’त त्याने जम बसविला. ‘ईझी बिल गेटवे’साठी त्याने एक फेक वेबसाइट सुरू केली. त्याचे ‘डोमेन नेम’ही विकत घेतले. ‘महा-ई-सेंटर’ हे गोंड्‌स नाव त्याने वेबसाइटला दिले. जीएसटी, आयआरसीटीसी, मनी ट्रान्स्फर, रेल्वे, विमान तिकीट, आधारकार्ड व मतदान कार्डचे बिल, कथित विविध सरकारी कामांची एजन्सी देण्यासाठी त्याने लोकांना मोबाईलवर ‘एसएमएस’ पाठविले. या ‘एसएमएस’मध्ये संपर्क क्रमांक व एजन्सी देण्याबाबतची माहिती देण्यात आली होती. या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क केले. त्यावेळी सरकारी कामे व विविध सुविधासंबंधी एजन्सी घेण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून ‘ईझी बिल गेटवे’द्वारे १५ हजारांची मागणी

एजन्सी घेऊ इच्छिणाऱ्यांनी ही रक्कम त्याच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन भरली; मात्र अनेक दिवस उलटूनही लोकांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे एजन्सी घेऊ इच्छिणाऱ्यांनी वेबसाइटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला; पण तो बंद होता. फसवणूक झाल्याची बाब हळूहळू लोकांच्या लक्षात येत गेली. पोद्दार व त्याच्या मुंबईतील साथीदाराने मिळून फेक वेबसाइटद्वारे देशातील १,०५० जणांची फसवणूक केली व त्यातून ५० लाख रुपये हडपल्याची माहिती समोर आल्याची बाब पोलिसांनी सांगितली. २०१७ मध्ये औरंगाबादच्या वदोड बाजार येथील रमेश कुलकर्णी यांचीही अशीच फसवणूक झाली. गुन्हा नोंद झाल्यानंतर ग्रामीण सायबर सेलने त्यांचा तांत्रिक तपास सुरू केला. 

‘डोमेन नेम’ केले होते खरेदी
शेखर आधी एका कंपनीच्या हेल्प सेंटरला होता. त्यामुळे त्याला संपर्काची शैली अवगत होती. त्याचाच वापर करून त्याने लोकांशी संपर्क साधून पंधरा हजार रुपये वेबसाइटवर भरण्यास भाग पाडले. शेखरकडे स्वत:चा लॅपटॉप होता. त्याद्वारे तो ‘महा-ई-सेंटर’नामक ‘फेक’ साइट चालवीत होता. त्याने वेबसाइटचे ‘डोमेन नेम’ खरेदी केले होते. 

औरंगाबाद ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी वेबसाइटची इत्थंभूत माहिती घेतली. त्यावेळी ती फेक असल्याची बाब समोर आली. ही वेबसाइट नागपूरमधून चालविली जात असल्याची बाब पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषण करून निष्पन्न केली. ‘डोमेन नेम’ विकणाऱ्या ट्रेडर्सची माहिती पोलिसांनी घेतली. वेबसाइट चालविणाऱ्याचा संर्पक क्रमांकही पोलिसांना मिळाला. लोकेशन ट्रेस करून पोलिस नागपुरात पोचले. तो ज्या भागात राहत होता तेथे पोलिसांनी चौकशी केली, त्याला ग्राहक म्हणून भेटले व खात्री करून उचलून औरंगाबादला आणले. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, सायबर सेलचे उपनिरीक्षक सय्यद मोसीन, प्रमोद भिवसने, दत्ता तरटे, रवींद्र लोखंडे, प्रेम मस्के, भूषण देसाई, योगेश तळमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनी त्याला पकडण्याची किमया साधली होती. 

त्याला करण्यासाठीही पकडल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा अफाट पैसा लोकांना गंडवून त्याने मिळविल्याची बाब समोर आली. हा पैसा चैनीसाठी तो वापरत होता. मुंबईत बसून त्याचा साथीदार काम करायचा. त्यालाही पोलिसांनी अटक केली होती. शेखर पोद्दार याने एवढ्यांना फसविले, की त्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केल्याचे समजताच पुन्हा अटकेसाठी इतर राज्यांच्या पोलिसांचीच स्पर्धा लागली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News