डोंंगरी इमारत दुर्घटना : फक्त एक खिळा ठोकला आणि सगळी इमारत उध्वस्त झाली...

तृषा वायकर
Wednesday, 17 July 2019

डोंगरी परिसरातील केसरबाई इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून,  आठ जण गंभीर जखमी झाले.

मुंबई - मुंबईत इमारती कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कालच एक डोगरी भागातील केसरबाई-2 ही इमारत कोसळली. केसरबाई-2 ही इमारत मुंबई महापालिकेने ऑगस्ट २०१७ या वर्षीच धोकादायक इमारत म्हणून जाहीर केली; पण ही इमारत का कोसळली? याचे कारण ऐकून थक्क व्हाल.

इमारतीच्या तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये काहीतरी काम चालू असल्याने आबिद नावाचा तरुण काहीतरी ठोकत होता. याचवेळी तेथील स्लॅब कोसल्याचा आवाज आल्याने तो पळून गेला मात्र काय झालं हे माहित करून घेण्यासाठी तो परत आल्यावर तेथील स्थानीकांनी त्याला बेदम मारहाण केल्याची माहिती संबंधित पोलिसांनी दिली. आबिदमुळेच ही इमारत कोसळली अस तेथील नागरीकांचा दावा आहे, मात्र याबाबत चौकशी चालू असल्याची माहिती डोंगरी पोलिसांनी दिली. 

डोंगरी परिसरातील केसरबाई-1 इमारतीच्या बाजूला उभी करण्यात आलेली तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून,  आठ जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्‍यता आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना घडली ती इमारत अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारा पथकाकड़ून ढिगारा हटविण्याचे काम अद्यापही सुरु होते.

 

 

मृतांची नावे: 
साबिया निसार शेख (वय २५), अब्दुल सत्तार कालू शेख (वय ५५), मुजमिल मन्सूर सलमानी ( वय १५), सायरा रेहान शेख (वय २५), जावेद इस्माईल (३४), अरहान शेहजाद (४०), कश्यप अमिरजान (१३), साना सलमानी (२५), झुबेर मन्सूर सलमानी (२०), इब्राहिम (दीड वर्ष) , अरबाज (७), शहजाद (८), यामिन मन्सूरी (५४). 

जखमींची नावे: 
फिरोज नाझिर सलमानी (वय ४५), आयशा शेख (३), सलमा अब्दुल सत्तार शेख (५५), अब्दुल रेहमान (३), नावेद सलमानी (३५), इम्रान हुसेन कलवानिया (३०), जाविद (३०), जीनत (२५), अलमा मोहम्मद रशिद इद्रिशी (२८).

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News