संपव जीवघेणा...

सागर बारटक्के
Saturday, 10 August 2019

मेघ गर्जना करिती वरुणराज हा कोपला
पाणी डोळ्यात साठावे "सागर" शहराचा झाला
 ताईच्या राखीआधी सोडला भावानेच श्वास...
 संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।३।।

 
करुणा यावी घायालांचि प्रकोपी निसर्गास 
संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।धृ।।

पाण्यात बुडाला रे साऱ्याचा संसारगाडा 
पै-पै जोडून केला झोपडीचाच मी रे वाडा
मोलाचा फक्त प्राण आता सुटले मोहपाश...
 संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।१।।

शेती- भाती बळीची अशी जलमय झाली
 दुभत्या जनावराना जलसमाधी मिळाली
 मिळणार नाही गणेशा तुज केवड़याचा सुवास...
 संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।२।।

मेघ गर्जना करिती वरुणराज हा कोपला
पाणी डोळ्यात साठावे "सागर" शहराचा झाला
 ताईच्या राखीआधी सोडला भावानेच श्वास...
 संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।३।।

वेली-घरे-मंदिरे झाली कोठे गायब
 जगदंबा आहे कोठे सांगावी तान्हयास सबब
 स्वर्ग होते आयुष्य आज भ्यालो या नरकास... 
संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।४।।

जात-धर्म नाही मोठा निसर्ग महान जगतात 
विसरू नको तरीही मानवता आहे अजुन माणसात 
जीवन म्हणजेच पाणी ठार करी त्याच जिवांस... 
संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।५।।

उधळली प्रलयी कुटुंबे सांगली शहर कोल्हापुर
 अश्रु भिजले पाण्यात तरी ओसरेना हा महापुर
कैसी करंगळी कृष्णाची कैसा शिवगंगा श्रावण मास...
 संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।६।।

लढ़तो आम्ही  नाशिबाशी जरी डोर तुझ्या हाताला
 क्षमेस पात्र ठरुही चूक कळली या मनाला 
तुझी दया असावी अन असाच माणुसकीचा सहवास...
 संपव जिवघेणा हा ऐसा महापुराचा त्रास ।।७।।

करुणा यावी घायाळांची  प्रकोपी निसर्गास 
संपव जिवघेणा हा महापुराचा त्रास ।।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News