तिवरे धरण फुटले, आता जालन्यातील धरणाचे काय होणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 4 July 2019

मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्‍यातील शेलूद येथील धामना धरणाच्या सांडव्याला गळती लागली

जालना - मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्‍यातील शेलूद येथील धामना धरणाच्या सांडव्याला गळती लागली. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली. प्रकल्प सुरक्षित असल्याचे ते म्हणाले. सुरक्षेचा उपाय म्हणून धरण क्षेत्रातील ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दोषींवर कारवाई  
तिवरेतील मदतकार्याचा आढावा घेण्यात येत असून, या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
तीन धरणे धोकादायक
रत्नागिरी जिल्ह्यातील तुळशी, शेल्डी, राजेवाडी या तीन धरणांची दुरुस्ती करणे अत्यावश्‍यक असल्याचे जलसंधारण विभागाने अहवालात नमूद केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News