#cwcfinal19 वर्ल्ड कपचा लॉर्ड न्यूझीलंड होणार...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 14 July 2019

वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. या वर्ल्ड कपमध्ये लॉर्डसवरील निकालांचा ट्रेंड कायम राहिला तर किवींची सरशी होऊ शकते.

यापूर्वीच्या चारही सामन्यांत पहिली बॅटिंग केलेला संघ जिंकला आहे. यात इंग्लंडचा ऑस्ट्रेलाविरुद्धच्या साखळीतील सामन्याचाही समावेश आहे. न्यूझीलंडचाही एक सामना झाला असून ते कांगारूंविरुद्ध हरले आहेत.यातील आणखी एक मुद्दा म्हणजे दर वेळी विजयी संघाचा धावांचा फरकही वाढत गेला आहे.

हा तपशील असा
पाकिस्तान – 7 बाद 308 विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 9 बाद 259 - 49 धावा
ऑस्ट्रेलिया – 7 बाद 285 विजयी विरुद्ध इंग्लंड – 44.4 षटकांत सर्वबाद 221- 64 धावा
ऑस्ट्रेलिया – 9 बाद 243 विजयी विरुद्ध न्यूझीलंड – 43.4 षटकांत सर्वबाद 157 - 86 धावा
पाकिस्तान – 9 बाद 315 विजयी विरुद्ध बांगलादेश – 44.1 षटकांत सर्वबाद 221 - 94 धावा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News