#cwc19 भारताला 'हा' वर्ल्ड कपचा सामना आठवणीत असणारच, ज्यामध्ये बांगलादेशने भारताला काढलं होतं बाहेर

योगिता सानप (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

नवी दिल्ली  - वर्ल्ड कप 2019 मध्ये मंगळवारी भारताचा सामना बांगलादेश सोबत आहे, असे मानले जाते की भारत या सामन्यामध्ये  जिंकू शकेल, मात्र क्रिकेटमध्ये कमजोर संघ समजला जाणारा बांगलादेश यंदाच्या गुणतालिकेतही एकदम खालच्या क्रमांकावर आहे. हे जरी सत्य असलं तरी यावेळेस बांगलादेशचे खेळप्रदर्शन उत्तम ठरले आहे, त्यामुळे बांगलादेश कोणत्याही वेळेस पलटी खाऊ शकते, असा अंदाज क्रिकेट विश्लेषकांनी वर्तवला आहे. 

जर अजूनपर्यंतचा इतिहास पाहिला तर या आधी बांगलादेशचा संघ भारतासह आणखी काही संघाना वर्ल्ड कपमधून बाहेर जाण्याचे कारण बनला होता. या स्तिथीत बांगलादेशला कमजोर समजणे चुकीचे ठरेल, कारण २००७ मध्ये भारताला याचा परिणाम भोगावा लागला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर गेला.

वर्ल्ड कप २००७मध्ये १७ मार्च रोजी भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात एक यादगार सामना झाला. हा तोच सामना होता 'ज्यामध्ये बांगलादेशने भारताला वर्ल्ड कप मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. या सामन्यात बांगलादेशने भारताला ५ विकेटने हरवले होते. या सामन्यात भारताचे अतिशय गाजलेले आणि नावाजलेले खेळाडू होते, परंतु सगळे खेळाडू बांगलादेश समोर कमजोर सिद्ध झाले. अतिशय गाजलेले खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, वीरेंद्र सहवाग, राहुल द्रविड असे दिग्गज खेळाडू बांगलादेशच्या खेळाडूंसमोर नाकाम ठरले. 

१७ मार्च रोजी झालेल्या सामान्यात भारत पहिला फलंदाजी करत पुर्णबाद १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत बांगलादेशने ५ बादच्या बदल्यात सामना आपल्या बाजूने करून घेतला. वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाला प्रेषकांचा रोष पत्करावा लागला. त्यांनतर जॉन राईट आणि राहुल द्रविड यांना संघाच्या बाहेर काढण्याच्या चर्चेला उधाण आले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News