#cwc - विराट कोहलीला ५०० रुपयांचा दंड, कारण ऐकून व्हाल थक्क

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • गुरूग्रामध्ये डीएलएफ फेज -1 मधील कोहलीच्या निवासी कोहलीच्या अर्धा डझन कार आहेत
  • कोहली पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याने अडचणीत सापडला आहे

गुरूग्राम - एकीकडे तीव्र उष्णतेमुळे सर्वत्र दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र विराट कोहली पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याने अडचणीत सापडला आहे.पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी गुरूग्राम महानगरपालिकेने (एमसीजी) विराट कोहलीला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गुरूग्रामध्ये डीएलएफ फेज -1 मधील कोहलीच्या निवासी कोहलीच्या अर्धा डझन कार आहेत. विराटच्या शेजाऱ्यांनी या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. विराटकडे काम करणाऱ्या नोकरांनी गाडी धुताना हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सध्या कोहली इंग्लंडमध्ये विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवित विश्वकरंडकाची विजयी सुरवात केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News