#cwc - भारत-पाक सामन्यापूर्वी पाकिस्तान मध्ये 'ही' व्हिडिओ वायरल, अभिनंदन यांची खिल्ली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • पाकिस्तानच्या एका वाहिनीने सर्व मर्यादा ओलांडत हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ तयार केला आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी महायुद्ध असते. दोन्ही देशांचे चाहते पूर्ण तयारीने सामन्यासाठी सज्ज असतात. अशातच पाकिस्तानच्या एका वाहिनीने सर्व मर्यादा ओलांडत हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ तयार केला आहे. 

पाकिस्तानमधील एक वाहिनीने अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका माणसाला व्हिडिओमध्ये घेऊन विश्वकरंडक सामन्यापूर्वी त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत असून भारतीय चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठविली आहे. अभिनंदन यांनी नुकत्याच झालेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या F16 लढाऊ विमानाला पाडले होते. यावेळी ते विमान पाकिस्तानच्या सीमारेषेत पडल्याने पाकिस्तान लष्कराने अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर 2 दिवसांत त्यांची सुटका करून त्यांना भारतात परत पाठविण्यात आले होते.

अभिनंदन यांची खिल्ली उडवल्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News