असं बनवा कस्टर्ड क्रिम बिस्कीट्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • कस्टर्ड क्रिम बिस्किट् ही खास ब्रिटीश डेलिकसी आहे आणि खरच ती बिस्कीटं ना भारतात चांगली मिळतात ना अमेरिकेत.
  • अगदी लहानपणी कोणी कोणी लंडनहून आणलेली कस्टर्ड क्रिम बिस्किटं खाल्ली आहेत.
  • परवा ब्रिटीश बेकींग शोमध्ये ही बिस्कीटं बघितली आणि करून बघायचा मोह झाला.
  • स्नो-डे मुळे घरात अडकून पडलेलो असताना वेळही मिळाला.

साहित्य 
बिस्कीटांसाठी

  • मैदा - १.५ कप 
  • कस्टर्ड पावडर - ०.५ कप
  • बटर - १.५ स्टीक 
  • पिठीसाखर - ०.५ कप
  •  बेकींग सोडा - ०.२५ टीस्पून

क्रीमसाठी

  • बटर - ०.२५ स्टीक पिठीसाखर - ०.५ साखर
  • व्हॅनिला इसेन्स - ५-६ थेंब

कृती

  1. मैदा, कस्टर्ड पावडर आणि बेकींग सोडा चाळणीतून चाळून घेतला. ह्यामुळे मैद्यात हवा जाऊन बिस्कीटं हलकी होतात.
  2. बटर आणि पिठीसाखर हँडमिक्सरने एकत्र करून गुळगुळीत पेस्ट बनवली.
  3. वरची दोन्ही मिश्रण एकत्र करून बॅटर बनवलं. हे केकच्या बॅटर इतकं पातळ होत नाही. पोळ्यांच्या कणकेपेक्षाही घट्ट असतं.
  4. बॅटरचे छोटे गोळे करून ते बेकींग ट्रे वर दाबून चपट करून बिस्कीटांचा आकार दिला. त्यावर काट्याने रेघा ओढून थोडसं डेकोरेशन केलं. बिस्कीटं कुकीकटर वापरून पण करू शकता. आमच्याकडे कुकीकटर नाहीये त्यामुळे ह्या पद्धतीने केलं.
  5. ३५० डिफॅ तापमानाला ओव्हनमध्ये १५ ते २० मिनीटं बिस्कीटं बेक करून घेतली. तळाच्या बाजूने रंग बदलायला लागल्यावर झाली असं समजावं. वरून थोडसं ओलरस लागलं तरी गार झाल्यावर नीट होतात.
  6. बिस्कीटं बेक होत असताना एकीकडे बटर, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र फेटून त्याचं क्रीम बनवलं.
  7. बेक केलेली बिस्कीटं जरा निवल्यावर दोन बिस्कीटं क्रिमचा थर देऊन एकमेकांवर चिकटवून घेतली. अगदी 'टेस्को'च्या तोडीची कस्टर्ड क्रिम बिस्कीटं तयार !! बिस्कीटं एकदम खुसखुशीत, तोंडात विरघळणारी वगैरे झाली आहेत!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News