अभ्यासक्रमातील बदल, मूल्यमापन पद्धतीमुळे निकालावर परिणाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांचे निरीक्षण
  • दहावीच्या निकालात गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात घट
  • यावर्षी औरंगाबाद विभागाचा निकाल 75.20 टक्के लागला आहे. 

औरंगाबाद - दहावीच्या निकालात गेल्या सात वर्षाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यावर्षी औरंगाबाद विभागाचा निकाल 75.20 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालामध्ये 13.61 टक्‍क्‍यांनी घट झाली. यावर्षी बदललेला आभ्यासक्रम, मुल्यमापनाची पद्धत व प्रश्‍नपत्रिकेत केलेला बदल यामुळे निकालात घट झाल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण (माध्यमिक विभाग) यांनी सांगीतले. 

डॉ. चव्हाण म्हणाले, की यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. यासोबतच मूल्यमापनाची पद्धत सुद्धा बदलण्यात आली होती. यापूर्वी अंतर्गत मूल्यमापन केले जायचे. तिन्ही भाषा विषयांमध्ये केले जाणारे हे मूल्यमापन 20-20 गुणांमध्ये विभागले जात होते. शाळेतर्फे देण्यात येणारे तीनही भाषेसाठी विषयनिहाय वीस-वीस गुण असे 60 गुण यावर्षी कमी करण्यात आले होते. गणित आणि विज्ञान विषयांमध्ये प्रात्यक्षिके घेतली जायची.

सोबतच, यावर्षी देण्यात आलेली प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका नसून ती एक कृतिपत्रिका होती. त्यालाच ऍक्‍टिव्हिटी शीट असेही म्हटले जात होते. यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते ते ज्ञानरचनावादावर आधारित होते. त्यामुळे औरंगाबाद विभागाचाच नव्हेतर संबंध राज्याचा निकाल मागील काही वर्षाच्या तुलनेत कमी लागलेला आहे. 

मुलांचे हक्काचे मार्क्‍स 
यावर्षी दहावीच्या परीक्षेत प्रश्‍नपत्रिकेऐवजी कृतीप्रतिका देण्यात आली होती. त्यामध्ये मुलांना यामध्ये ज्ञानरचनावादावर आधारित प्रश्‍न विचारले होते. त्यात घोकंमपट्टी व कॉपी करण्यास काहीही वाव नव्हता. यामध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या अभ्यासक्रमावरही प्रश्‍न विचारण्यात आले होते. या कृतिपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वमतांना जास्त महत्व होते. हे मुलांचे स्वतःचे हक्काचे मार्क्‍स आहेत. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम भविष्यात मुलांना फायद्याचा राहाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News