जादूटोणा विरोधी कायद्याचा अभ्यासक्रमात समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ चा गोंडवाना विद्यापीठाच्या समाजशास्त्र, विधी विद्याशाखेत समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर : महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ चा गोंडवाना विद्यापीठाच्या समाजशास्त्र, विधी विद्याशाखेत समावेश करण्यात आला आहे. या क्रांतिकारी कायद्याचा अभ्यासक्रमात समावेश करणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निमुलन समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य अ‍ॅड. गोविद भेंडारकर यांनी सातत्याने विद्यापीठात या अभ्यासक्रमाचा समावेश होण्यासाठी पाठपुरावा केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जादूटोणा विरोधी कायद्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला. 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने २०१३ रोजी राज्यात लागू झालेला जादूटोणा विरोधी कायदा गोंडवाना विद्यापीठाच्या चालू शैक्षणिक सत्रापासून बी. ए. तृतीय (समाजशास्त्र) आणि २०२०- २०२१ पासून पाच वर्षीय विधी पदवी अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरला शिकविण्यात येणार आहे.

क्रांतिकारी स्वरूपाच्या कायद्याचा अभ्यासक्रमात समावेश केल्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्याणकर, उपकुलगुरू डॉ. भुसारी, कुलसचिव डॉ. मोहुर्ले, डॉ. कावळे, राजू मुनघाटे, प्रा. डॉ. कोकोडे, डॉ. प्रदीप घोरपडे, डॉ. अनिल चिताडे, डॉ. सुनील साकुरे, डॉ. अंजली हस्तक यांचे आभार मानले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News