येथे फुग्यांऐवजी वापरतात 'कंडोम'

हर्षल भदाणे पाटील
Wednesday, 30 January 2019

     कंडोमचा वापर हा सुरक्षित सेक्ससाठी केला जातो परंतू सध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्युबा हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. स्पॅनिश महान नाविक ख्रिस्तोफर कोलंबस येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले.

काय आहे नेमके कारण?
क्यूबात असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत मॉडेलच्या केंद्रीयकृत आर्थिक व्यवस्थेच्या कारणांमुळे दुकांनामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंचा अभाव आहे. मूलभूत वस्तूंच्या कमतरतेमुळे त्यांनी कंडोम पासून रोजच्या वापराच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे.

कसा होतो कंडोमचा वापर ?
केसांचे रबर, फुगे, पाण्यावर तरंगणारे फ्लोट या वस्तूंसाठी कंडोमचा वापर केला जातो. नाईलाजाने केसाच्या रबर बॅन्डसाठी कंडोमचा वापर करावा लागतो. तसेच लहान मुलं वाढदिवसाच्या सजावटीसाठी कंडोमचे फुगे बनवून ते उडवतात. समुद्र किनारी वापरले जाणारे फ्लोट यांना बाधण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी देखील आता कंडोमचा वापर केला जातो.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News