परभणी जिल्ह्यातील या मतदार संघात उमेदवारांची गर्दी

भास्कर लांडे
Wednesday, 12 June 2019

परभणी: गंगाखेड हा पारंपारिक मदतारसंघ नेहमीच चर्चेत असते. चर्चा यंदाही होत असून जिल्ह्यावासियांचे लक्ष गंगाखेडकडे लागले आहे. कारण पारंपारिक लढतीत मित्रमंडळे आणि वंचित आघाडीने शडू ठोकला आहे.

परभणी: गंगाखेड हा पारंपारिक मदतारसंघ नेहमीच चर्चेत असते. चर्चा यंदाही होत असून जिल्ह्यावासियांचे लक्ष गंगाखेडकडे लागले आहे. कारण पारंपारिक लढतीत मित्रमंडळे आणि वंचित आघाडीने शडू ठोकला आहे.

गतवेळी भाजपने मित्रपक्षरासपला जागा सोडल्याने उद्योगपती डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक लढविली. ते दोन हजार २०० मताच्या फरकानेपराभूत झाले. त्यांच्यासह भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गणेश रोकडे, डॉ. सुभाष कदम इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आणि विद्यमान खासदारांसोबत झालेल्या वादामुळे सेनेतून बाहेर पडून मित्रमंडळामार्फत मैदानात उतरलेले संतोष मुरकुटे यांनी
वर्षभारापासून तयारी सुरू केली आहे. 

दुसरीकडे माजी आमदार सिताराम घनदाट यांनी खुल्या जागेतून बाजी मारणारा अनुसूचित जातीचा नेते म्हणून
इतिहास घडविला आहे. त्यांनी तीनवेळा गंगाखेडचे प्रतिनिधत्व केले असून तेही निवडणूक रिंगणात आहेत. आघाडीतराष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जागा आल्याने विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासोबत डॉ. संजय कदम इच्छुक आहेत. 

काँग्रेसकडे नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांचा वानवा असून तरीही गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया आणिगोविंद यादव यांच्याशिवाय तिसरं नाव काँग्रेसकडे नाही. लोकसभेत ३२ हजार मतदान घेवून बहूजन वंचित आघाडीनेसर्वांनाच घाम फोडला. वंचितकडून समाजसेवक मारोतराव पिसाळ, युवानेते अभय कुंडगीर इच्छुक आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News