तरुणाईत अशा गिफ्ट्‌सची क्रेझ

सुस्मिता वडतिले
Wednesday, 26 June 2019
  • फॅशनच्या दुनियेत प्रत्येक जण स्वत:ला सर्वच बाबतीत टापटीप ठेवण्याचे प्रयत्न करतो.
  • बदलत्या काळात खाण्या-पिण्यासह कपडे, दागिन्यातही ट्रेंडी फॅशन सुरू झाली आहे.
  • फॅशनेबल तरुणाई वेगवेगळे कस्टमाईझड गिफ्ट्‌स खरेदी करू लागली असून समोरच्या व्यक्‍तीलाही त्याची भुरळ पडत आहे.

फॅशनच्या दुनियेत प्रत्येक जण स्वत:ला सर्वच बाबतीत टापटीप ठेवण्याचे प्रयत्न करतो. बदलत्या काळात खाण्या-पिण्यासह कपडे, दागिन्यातही ट्रेंडी फॅशन सुरू झाली आहे. त्यामध्ये कस्टमाईझड गिफ्ट्‌स कॉफी मग, व्हाईट मग, कलर मग, फुल ब्लॅक मग, कपल मग, हर्ट हॅंडल मग, मॅजिक मग, टी-शर्टस, राखी, की-चेन, सिप्पर बॉटल, वॉटर बॅग, पिलो कव्हर्स, माऊस पॅड तसेच मोबाईल कव्हरमध्ये 2डी (यावर ग्लॉसी प्रिंट येते व बाजूने ट्रान्स्परंट असतो), 3डी (मॅट प्रिंट असते अन्‌ त्यावर फुल प्रिंट असते) आणि 4डी अशा प्रकारचे गिफ्ट्‌स बाजारात सध्या उपलब्ध आहेत. 

त्यावरील चित्रे, प्रिंट, ट्रान्सपरंटपणाचा विचार करून अशा गिफ्ट्‌स खरेदीकडे तरुणाईचा कल वाढतोय. कस्टमाईझड गिफ्ट्‌समुळे समोरच्याला त्याची कायम आठवण राहते. तरुणाईच्या ट्रेंडी लुकमुळे कस्टमाईझड गिफ्ट्‌सला "अच्छे दिन' आल्याचेही चित्र बाजारात दिसते. फॅशनेबल तरुणाई वेगवेगळे कस्टमाईझड गिफ्ट्‌स खरेदी करू लागली असून समोरच्या व्यक्‍तीलाही त्याची भुरळ पडत आहे. त्यामध्ये 3डी कव्हरला मोठी मागणी आहे. तरुणाईसह महिलांचा टेडी, पांडा, गुलाबी, किंग-क्वीन, कपल कव्हर्स खरेदी वाढत असल्याचे विक्रेते सांगतात. 

ग्राहकाच्या डोक्‍यात जी काही कल्पना असेल, त्याप्रकारे गिफ्ट्‌स बनवून दिले जातात. वेगळेपणा, तरुणाईचा कल, आकर्षक डिझाईनमुळे कस्टमाईझड गिफ्ट्‌सला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. 
- के. मृणाल, गिफ्ट विक्रेता

आम्ही एका दुकानातून कॉफी मग बनवून घेऊन माझ्या मुलाला गिफ्ट दिला. त्याच्यावर त्याच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांचे फोटो आहेत. माझ्या मुलाला हे गिफ्ट खूप आवडले. माफक किमतीत कस्टमाईझड्‌ गिफ्ट मिळत असल्याने त्याकडे कल वाढतो आहे. 
- डॉ. प्रियंका धुळप, सोलापूर

आम्हाला कराटेसाठी वेगवेगळ्या सामन्यांसाठी प्रत्येक वेळेस नवीन टी-शर्ट प्रिंट करावे लागतात. एक किंवा दोन टी-शर्ट प्रिंट करून मिळत नाहीत, पण काही दुकानात हे मिळतात. 
- भुवनेश्‍वरी जाधव, 

 

कॉलेजमध्ये दरवर्षी एक्‍झिबिशन होते. त्यामध्ये चित्र प्रदर्शनाचा महत्त्वाचा भाग असतो. यावर्षी सर्वांचे लक्ष खेचणाऱ्या प्रदर्शनातल्या भाग म्हणजे प्रिंटेड मग. त्या मगची क्वॉलिटी खूप उत्तम आहे. 
- भक्ती उदनूर, विद्यार्थिनी, सोलापूर 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News