उत्तर प्रदेशातले गुन्हेगार सरकारच्या खिश्यात आहेत का? प्रियांका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019
  • आदित्यनाथ सरकारवर टीका; गुन्ह्यांत घट झाल्याचा पोलिसांचा दावा

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार मोकाट सुटले असून, एकामागून एक गुन्हे घडत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर लोटांगण घातले की काय, असा सवालही प्रियांका यांनी ट्विट करत केला. मात्र पोलिसांनी राज्यातील गुन्ह्यांत घट झाल्याचा दावा केला आहे.

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये उत्तर प्रदेशातील घटनांची कात्रणे जोडली आहेत. बदायूँतील बंदुकीचा धाक, अमेठीतील गोळीबार, उन्नावमधील तुरुंगात कैद्यांकडून   बंदुका   दाखवणे  यांसारख्या १५ घटनांचा उल्लेख केला आहे.  दरम्यान, प्रियांका गांधी यांच्या ट्विटला पोलिसांनी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे, की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील 

आरोपीविरुद्ध कारवाई केली जात आहे. दोन वर्षांत ९ हजार २२५ गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या असून, ८१ जण मारले गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली २ अब्ज मालमत्ता जप्त केली असून दरोडा, खून, अपहरण, खंडणी यांसारख्या घटनांत घट झाल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News