धक्कादायक! सेक्स करण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या करून कापलं स्वत:चं गुप्तांग 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात कथित स्वरूपात पत्नीने पतीसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात कथित स्वरूपात पत्नीने पतीसोबत सेक्स करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत:चं गुप्तांग कापलं असून या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या पत्नीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीवर गोरखपूर येथील बाबा राघव दास मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरु आहेत. आरोपीचं एका वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं आणि तो कामानिमित्त सूरत येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या घरी परत आला होता. आरोपीचं वय २४ वर्षे असून मृतक महिलेचं वय २१ वर्षे होतं. 

रुग्णालयात मीडियासोबत बोलताना आरोपीने म्हटलं की, माझ्या पत्नीला वारंवार विनंती करुनही तिने सेक्सला नकार दिला त्यामुळे मला राग आला आणि मी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मी माझं गुप्तांग कापलं. सिद्धार्थनगरचे पोलीस अधिक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, महिलेच्या वडिलांनी कथित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे की त्यांच्या मुलीला हुंड्यासाठी त्रास दिला जात होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News