वर्ल्डकप संपताच असा असेल कसोटीचा जल्लोष... यजमानपद असेल पुण्याला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या भरगच्च कार्यक्रमाची घोषणा केली. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यातील हा कार्यक्रम असून, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या दरम्यान भारताचा दौरा करणार आहेत. यात दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसोटीचे यजमानपद पुण्याला देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाच्या भरगच्च कार्यक्रमाची घोषणा केली. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यातील हा कार्यक्रम असून, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या दरम्यान भारताचा दौरा करणार आहेत. यात दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसोटीचे यजमानपद पुण्याला देण्यात आले आहे.

या भरगच्च कार्यक्रमात पाच कसोटी, नऊ एकदिवसीय आणि 12 टी-20 सामने होणार आहेत. बांगलादेश प्रथमच भारताचा दौरा करणार आहे. या कार्यक्रमात भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि बांगलादेशाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळेल. या दोन्ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील असतील.

प्रथम सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येणार असून, ते तीन कसोटी सामन्यांबरोबरच तीन टी-20 सामने खेळतील. हा पूर्ण दौरा नसेल, दक्षिण आफ्रिका संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी मार्च 2020मध्ये पुन्हा भारताचा दौरा करेल. बांगलादेशाविरुद्ध टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल. याखेरीज पुढील वर्षी 2020 मध्ये जानेवारीत झिंबाब्वे तीन टी-20, ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहेत.

असा असेल कार्यक्रम
दक्षिण आफ्रिका - पहिली टी-20 (धरमशाला, 15 सप्टेंबर), दुसरी टी-20 (मोहाली, 18 सप्टेंबर), तिसरी टी-20 बंगळूर (22 सप्टेंबर), पहिली कसोटी (विशाखापट्टणम, 2 ते 6 ऑक्‍टोबर), दुसरी कसोटी (रांची 10 ते 14 ऑक्‍टोबर), तिसरी कसोटी (पुणे, 19 ते 23 ऑक्‍टोबर)

बांगलादेश - पहिली टी-20 (दिल्ली, 3 नोव्हेंबर), दुसरी टी-20 (राजकोट, 7 नोव्हेंबर), तिसरी टी-20 (नागपूर, 10 नोव्हेंबर), पहिली कसोटी (इंदौर, 14 ते 18 नोव्हेंबर), दुसरी कसोटी (कोलकता 22 ते 26 नोव्हेंबर)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News