#cricket - धोनीचे फॅन आहात? मग 'या' हॉटेलमध्ये जेवण मोफत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • धोनीचा निस्सिम भक्त असलेला शंभू बंगालमध्ये 'एम एस धोनी' या नावाने हॉटेल चालवतो.
  • ''या दुर्गापूजेला माझ्या हॉटेलला दोन वर्षे पूर्ण होतील.
  • बंगालमध्ये सर्वांनाच या जागेबद्दल माहित आहे आणि तुम्ही एकदा तरी इथे यायलाच हवे, अशीच ही जागा आहे

कोलकता - तुम्ही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फॅन आहात? आणि तुम्ही शंभू बोसच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले आहात? असे असेल तर तुम्हाला जेवणाचे पैसेही द्यावे लागणार नाहीत. बंगालमध्ये राहणारा धोनीचा चाहता त्याच्या हॉटेलमध्ये सर्वांना मोफत जेवण देतो. 

धोनीचा निस्सिम भक्त असलेला शंभू बंगालमध्ये 'एम एस धोनी' या नावाने हॉटेल चालवतो. ''या दुर्गापूजेला माझ्या हॉटेलला दोन वर्षे पूर्ण होतील. बंगालमध्ये सर्वांनाच या जागेबद्दल माहित आहे आणि तुम्ही एकदा तरी इथे यायलाच हवे, अशीच ही जागा आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले.  धोनीचे कौतुक करताना तो म्हणाला, ''त्याच्या सारखं कोणीच नाही. माझं लहापणीपासून त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्या खेळामुळे आणि त्याच्या व्यक्तिमत्वामुळे तो लिजंड बनला आहे.तो माझं प्रेरणास्थान आहे.'' 

''धोनी जर कधी मला भेटला तरी मी त्याला माझ्या हॉटेलवर जेवायला यायची विनंती करेल. त्याला भारत आणि मासे आवडतात हे मला माहित आहे,'' असेही त्याने सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News