तुम्ही अशी मलई मिरची बनवलात का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

साहित्य 

साहित्य 

  • एक कप हिरव्या मिरच्या चिरुन तुकडे (तुकडे साधारण बोटाच्या पेराच्या निम्मे
  • व्हिपिंग क्रीम (इथे अमेरिकेत कॅन मध्ये मिळते. ) अर्धा कप किंवा लागेल तशी.
  • १/२ चमचा हळद,
  • १ चमचा जिर्‍या धन्याची पावडर
  • हिंग
  • तेल

कृती

  1. तेल ताप्वून त्यात हिंग घालावा.
  2. जिरे घालुन तडतडले कि मिरच्या घालुन परतावे. फार रंग जाई पर्यंत परतु नये.
  3. जिर्‍या धन्याची पावडर,हळद घालून परतावे.
  4. आता त्यात क्रीम ओतावी. (साय वापरत असाल तर थोडी चमच्याने बारीक करुन मग घालावी. परतत रहावे. आळत आले कि मीठ घालुन गॅस बंद करावा. झाकण लावू नये. (मिरच्या सॉगी होतात. त्या करकरीतच राह्यला पाहिजेत. )
  5. वरून लिंबू पिळुन गरम चपात्यांबरोबर खावी.
  6. एकदम सिंपल परंतु पाहुण्यानी प्रत्येक वेळि मागून मागून खाल्ली आहे. कधी कधी मी यात भरडलेले धने , पावडर बडिशेप घालते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News