'धडकन'च्या कथेचा क्रेज अजुनही

काजल डांगे
Saturday, 20 July 2019

2000  सालामधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘धडकन’ चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी, अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट कथेच्या बाबतीतही यशस्वी ठरला. 

मुंबई :  2000  सालामधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीत ‘धडकन’ चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी, अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट कथेच्या बाबतीतही यशस्वी ठरला. 

नात्यांची गुंतागुंत, प्रेमभावनेतून निर्माण होणारे समज-गैरसमज आणि लव्ह ट्रॅंगल हे हिंदी चित्रपटांमध्ये पाहायलाच मिळतं; पण ‘धडकन’मध्ये हे सारं वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलं. म्हणूनच या चित्रपटाने तिकीटबारीवर गर्दी केली. सुनील शेट्टी तर ॲक्‍शन हिरो. पण त्याने या चित्रपटात साकारलेली नकारात्मक भूमिका आणि कथेच्या गरजेनुसार दिसलेला त्याचा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. 

सुनील या चित्रपटामधील एका संवादामुळे विशेष भाव खाऊन गेला आणि तो संवाद होता ‘मैं तुम्हे भूल जाऊँ ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दुंगा’.  शिल्पाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सुनीलच्या या संवादाने चित्रपटाला चार चाँद लावले. धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. शिवाय धर्मेश यांनीच या चित्रपटाचे संवादलेखनही केले. तसेच या चित्रपटामधील ‘दिल ने ये कहा है दिल से’, ‘ना 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News