"ही" जो़डी तब्बल ३० वर्षांनंतर एकञ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

आता अभिनेता अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही तब्बल ३० वर्षांनंतर दिग्दर्शक सुभाष घई यांच्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येणार आहेत.

अभिनेता अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ ही जोडी ‘राम-लखन’, ‘परिंदा’, ‘कभी ना कभी’ यासरख्या अनेक चित्रपटात एकत्र दिसून आली.

आता हे दोघेही तब्बल ३० वर्षांनंतर दिग्दर्शक सुभाष घई यांच्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येणार आहेत. ‘रामचंद किशनचंद’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. हा एक क्राईम-कॉमेडी चित्रपट असणार आहे.

‘राम-लखन’ या चित्रपटात साकारलेली पोलिसांची भूमिका ते पुन्हा एकदा साकारणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षी सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News