देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज - संजय दत्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019

 युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने पाठिंबा दिला आहे. संजय दत्तने नुकतंच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात त्याने आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई :  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने पाठिंबा दिला आहे. संजय दत्तने नुकतंच एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यात त्याने आदित्य ठाकरेंना भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 <

>

येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत आदित्य यांना मोठ्या प्रमाणात मतदान करा, असे आवाहन संजय दत्तने केलं आहे. “आदित्यला माझ्या शुभेच्छा. येत्या विधानसभेला तो मोठ्या मतधिक्याने जिंकेल” असा विश्वासही संजय दत्तने व्यक्त केला. “आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज आहे”, असं सांगत संजय दत्तने आदित्य ठाकरेंची पाठराखण केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News