नगरसेवकाच्या मुलांनी तरुणाच्या डोक्यात फोडल्या 8 बिअरच्या बाटल्या

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Tuesday, 6 August 2019
  • पनवेल मध्ये कायद्याचा धाक उरला आहे की नाही?

  • नगरसेवकाच्या मुलांची गुंडगिरी

कळंबोली : पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुलं आणि भाच्यानं एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. येथील रोडपाली नजीकच्या गिरिराज रेस्टॉरंट अँड बारसमोर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास  नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांसह एक भाचा अशा चौघा जणांनी विश्वनाथ गायकवाड या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या विश्वनाथवर पनवेलमधील स्पर्श रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हाणामारीची तक्रार केल्याचा राग डोक्यात ठेवून तक्रारदाराच्या भावालाच बेदरकारपणे मारणाऱ्या टोळक्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांचे तीन पुत्र आणि भाचा असल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

या नगरसेवक पुत्र आणि भाच्यानं दोन दिवसांपूर्वी विश्वनाथ गायकवाडचा भाऊ सिद्धार्थला मारहाण केली होती. त्यानं याविरोधात तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात ठेवून विश्वनाथवर जीवघेणा चढवला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही कारणावरून जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी सिद्धार्थला मारहाण केली होती. याबाबत त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यानं आमच्या विरोधात कोण तक्रार दाखल करू शकतो? असं म्हणत जगदीश गायकवाड यांची मुले सिद्धार्थचा शोधत घेत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे याचा राग त्यांनी विश्वनाथवर काढला.

गुन्हा दाखल
गुन्हा दाखल

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News