वादग्रस्त ट्विट करणारी अधिकारी आता मंत्रालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • निधी चौधरी यांची मंत्रालयात बदली
  • राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारने त्यांची बदली केली. ​

मुंबई - महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची सरकारने सोमवारी (ता.२) तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली. 

बदली होण्यापूर्वी चौधरी मुंबई पालिकेत उपायुक्‍त पदावर कार्यरत होत्या.  चौधरी २०१२ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी १७ मे रोजी महात्मा गांधी यांच्याविषयी ट्विट केले.

त्याबाबत समाजमाध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी ते  ट्विट  काढून टाकले. तसेच आपल्या विधानाचा विपर्यास केला, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर सरकारने त्यांची बदली केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News