'नाले, गटारे साफ करायला काय मी खासदार झाले नाही', या महिला नेत्याने केले हे वादग्रस्त विधान, व्हिडीओ झाला वायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • प्रज्ञासिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य 
  • व्हिडीओ व्हायरल

सिहोर : ‘‘नाले, गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनले नाही,’’ असे वक्तव्य करून साध्वी प्रज्ञासिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले.  

साध्वी प्रज्ञासिंह बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात. नव्या वक्तव्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवली आहे. 

सिहोर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात संवाद साधताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे वक्तव्य केले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ‘‘लक्षात ठेवा, आम्ही नाले स्वच्छ, शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती कामे आम्ही प्रामाणिकपणे करू.’’

यापूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले होते; तसेच हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविरोधातही विधान केले होते. त्यामुळे वाद झाला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News