मुस्लिम तरुणांच्या शिक्षणासाठी सर्वाधिक निधी खर्च करणारा आमदार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019

मालेगावातील झालेली दंगल आणि स्फोट यामुळे मालेगावचे नाव कुठेतरी काळ्या यादीत पडले आहे. मात्र मालेगावचा हा चेहरा बदलण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात. त्यातीलच काँग्रेसचे आमदार आसिफ शेख एक नाव आहे. एक मुस्लिम चेहरा आणि वेगळं राजकारण करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय मालेगावातील मुस्लिम तरुणांसाठी सर्वाधिक निधी खर्च करणारा आमदार आहेत. सकाळ  माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी त्यांची घेतलेली विशेष मुलाखत.  

आता मालेगावची परिस्थिती नेमकी कशी आहे?
संपूर्ण देशातून मालेगाव या शहराला एका वेगळ्या नजरेने पहिले जाते. येथील वातावरण खराब आहे, इकडे स्फोट मोठ्या प्रमाणात होतात, हिंदू- मुस्लिम  बांधवामध्ये एकता नाही, असे बाहेरील जनतेला वाटते. मात्र  मालेगावमध्ये तसं काही नसून मालेगाव मध्ये हिंदू-मुस्लिम मिळून मिसळून राहतात. येथील जनतेचे विचार हे जातीवादाचे नसतात. या भागात झोपड्या मोठया प्रमाणात  असल्याने येथील मुलांना योग्य प्रकारे शिक्षण मिळत नाही.

महाराष्ट्रातील प्रत्येक समाजावर मालेगाव म्हणजे दंगल असं बिंबवलं जातं, ते कितपत योग्य आहे?
हे चुकीचंच आहे. राजकीय दृष्ट्या नफा मिळावा म्हणून काही लोक या भागात दंगल करत होते. पण आज १० वर्ष झाली मालेगाव शहरात एकही दंगल झाली नाही आणि इकडचे नागरिक हे मिळून मिसून राहतात आणि पुढे देखील असेच राहतील.

निवडणूक आल्या की मालेगावात दंगली होतात, नक्की यामागे आहे तरी कोण?
२० वर्षापासून या ठिकाणी दंगल झाली नाही. विधानसभेचे ४, लोकसभेचे ४, महानगरपालिकेचे ४ अशा एकूण १२ निवडणूक झाल्या तरी एकपण दंगल झालेली नाही. मालेगावचे तरुण हे शिक्षित झाले आहेत त्यांना असे मला वाटते.  मालेगावमध्ये विकास व्हावा अशा विचारांचे युवक येथे असल्यामुळे मला नाही वाटत आधी सारखी परिस्थिती इकडे उद्धभवेल.

भारतातील मुस्लिमांकडे नेहमी संशयाने पाहिलं जाते, तुम्हाला कधी अनुभव आला का?
२०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली. भाजपचे विचार हे नेहमी दोन लोकांना जोडून ठेवण्याचे असतात. मी असे मानतो की, देश सुरक्षित आहे. देश स्वातंत्र्य झाला तेव्हा सगळ्या धर्मातील लोकांचं योगदान होत. सगळे लोक हे धर्माच्या विरोधात नसतात. भारतात रहायचं असेल तर तुम्हाला "वंदे मातरम" बोलावं लागेल किंवा "जय श्री राम" असं बोलावं लागेल, असं बोलणारी फक्त २/३ टक्के लोकं आहेत.

काँग्रेसची वाताहत झाली, आणि आता पक्ष सोडावा, असं कधी झालंय का? 
काँग्रेस पक्ष हा सगळ्या धर्माना आणि सगळ्या पक्षांना सोबत घेऊन पुढे जातो. आज भाजपचे जे विचार आहेत, ते समाजासाठी घटक आहेत. त्यांनी तीन तलाक पद्धत बंद केली. अल्पसंख्य समाजाच्या विरोधात जे कायदे बनवले. ते चुकीचे आहेत. आम्ही समाजाला सोबत घेऊन पुढे जात आहे. 

तीन तलाकवर तुमच्या मतदारसंघात चर्चा होते का?
देशातून तीन तलाक कायद्याच्या विरोधात १ लाख मुस्लिम महिला समोर आल्या. यावरून हे सिद्ध होत की आम्ही या कायदयाच्या विरोधात आहोत. हा कायदा आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करणारा आहे. सरकारला जर हे करायचं होत, तर त्यांनी सगळ्यांना विचारात घेऊन करायला पाहिजे होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News