आश्रमशाळांमध्ये भरणार कंत्राटी कलाशिक्षक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

अकरा महिन्यांसाठी कलाशिक्षकाला महिना २० हजार रुपये मानधन मिळणार आहे. पूर्णवेळ कला शिक्षकासाठी ए.टी.डी. आवश्यक आहे.

चोपडा - केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई ॲक्‍ट २००९ नुसार कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव या विषयांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्ती करण्याची तरतूद आहे.

त्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये कला (कार्यानुभव) शिक्षकाचे नियमित पद मंजूर होईपर्यंत प्रत्येक आश्रमशाळेत कंत्राटी पद्धतीने कलाशिक्षक नेमणूक करण्यासंदर्भात शासनाने १३ जून २०१९ अन्वये अध्यादेश काढलेला आहे. 
अकरा महिन्यांसाठी कलाशिक्षकाला महिना २० हजार रुपये मानधन मिळणार आहे. पूर्णवेळ कला शिक्षकासाठी ए.टी.डी. आवश्यक आहे. तसेच उच्चशिक्षित ए.एम.बी.एफ.ए. आणि नृत्य गायन, वादन विषयातील पदवी असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

कला शिक्षकांसाठी वयोमर्यादा किमान १८ आणि कमाल ४३ असणार आहे. जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), ए.टी.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रकल्प अधिकारी या चार सदस्यीय समितीमार्फत कला शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News