पालकांना दिलासा; शिक्षण विभागही चिंतामुक्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळाने नुकताच जाहीर केला आहे.
  • परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण 36 हजार 880 विद्यार्थी बसले होते.
  • विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतेही टेन्शन आजच्या घडीला नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

यवतमाळ: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळाने नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण 36 हजार 880 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 25 हजार 371 विद्यार्थी पास झाले असून, 12ची प्रवेशक्षमता 40 हजार 600 आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतेही टेन्शन आजच्या घडीला नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्येपेक्षा 12वीच्या प्रवेशक्षमता जास्त असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता अडचण जाणार नाही. शिवाय दहावीत एटीकेटी मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचादेखील प्रवेश होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात एकूण 17 महाविद्यालये आहेत. त्यापैकी स्वातंत्र्य कनिष्ठ 57, माध्यमिक, उच्च माध्यमिक 242, ज्युनिअर 316 आहेत. त्यात तुकड्या 438 यामध्ये कला 277, विज्ञान 124 , वाणिज्य 22, संयुक्त 15 आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाकरिता कोणतीच अडचण जाणार नसल्याचे माध्यमिक विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News