संपर्क टुटा है होसला नहि | विक्रम रुका है | इसरो नहि |

सुरज वायदंडे
Tuesday, 10 September 2019

आपला चंद्रमा सर्वसामान्य प्रमाने तो संशोधकांचा ही कुतुहलाचा विषय आहे. मानवाने या पुर्वीच चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

चंद्र आणि आपल सगळ्यांच नात लहानपनापासुन आहे, कारण आपल्या लहानपणाच्या गोष्टीतुन चांदोबा आणि आपल असं जवळच नात निर्माण झाले आहे. रडणाऱ्या लहान बाळाला आपण चांदोबा दाखवला कि तो ही रडायचा थांबतो. किंवा आपल्या काणावर लहानपणापासुन पडणारे चांदोमामाची छाप किंवा चांदोमामाची लहानपणापासुन ची गाणी आपल्याला आपलीशी वाटतात. आपण सगळ्यांनी सहसा हे गाण गुणगुणले असेल किंवा श्रवण झाले असेल.

ते गाण म्हणजे निंबोळीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या तानूल्याला झोप का ग येत नाही. आपल्याला काही कळत नसतानाही चांदोबा चंदामामा किंवा चंद्रमा आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्याच पोर्णिमेच संपुर्ण शितल रुप उजळलेल असतं अन् ते पाहतचं राहावं वाटतं. त्याचा शितल प्रकाश सजिवर्सष्टीला आपल्या असण्याचं अस्तीत्व देत असतं अगदी. तो ढगाआड गेला कि पडणारा काळोख मनात असंख्य प्रश्ना निर्माण करतो. अन् त्यातुन तो बाहेर आला कि आपणाला आपल्या मनातील काळोखाला दुर लोटतो. 

आलल्या साहित्य कारांनी चंद्राला खुप काही उपमा दिल्यात व त्याच वर्णन ही खुप केले आहे प्रत्येक कवीला लेखकाला चंद्राने भावुन सोडले आहे. त्याचे कौतुक करायला शब्द कमी पडतात. असा तो चंद्र कधी शितलतेने तर कधी कमी जास्त होणाऱ्या आकाराने आपल्याला मोहीत करत असतो. आपला चंद्रमा सर्वसामान्य प्रमाने तो संशोधकांचा हि कुतुहलाचा विषय आहे. मानवाने या पुर्वीच चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

चंद्रावर पहिले पाऊल नासा च्या निल आर्मर्स्टाग याने ठेवले होते. यानंतर बऱ्याच देशांनी चंद्रावर संशोधानासाठी यान पाठवले पण काही मोजक्याच देशांना या मोहिमेत यश आहे. यात आपल्या एकमेव भारतानेच पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर यशस्वी मोहिम केली होती. भारतीय संशोधनांनी हे मिळवलेल यश खुप मोठ होतं आणि पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी झालो होतो.

त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इसरो हि आहे आपल्या संशोधकांनी आपल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे त्यांच्याकडुन सगळ्यांच्या अपेश्रा वाढल्या होत्या. या सगळ्यात इसरो ची यशस्वीवाटचाल चालुच होती. इसरो ने एकाच वेळी शंभर उपग्रह यशस्वी प्रश्रेपित करुन आपली ताकद जगाला दाखवली होती. अन या सगळ्यातचं भारताने चंद्रयान 2 ची माहिम जाहिर केली.

काही कारणामुळे त्याच्या वेळेत बदल करुन इसरो चे महत्वकांशी मोहिम चंद्रयान 2 चंद्राच्या दिशेने प्रवास 22 जुलै ला सुरु झाला होता. आतापर्यतचे सर्व टप्पे व्यवस्थीत पार पडले होते. या मोहीमेतील अचुकता इसरो च्या अवकाश तंत्रज्ञानातील क्षमतेचे सामथ्य दाखवत होते. भारत असा पहिलाच देश होणार होता ज्याने चंद्राच्यादक्षिण धृवाजवळ जाणार होता.

असा आजवर कोणताच देश चंद्राच्या या भागात पोहोचला नव्हता. मोहिमेतील सगळे निट चालले होते. शुक्रवारी पहाटे 1:30 वाजतो भारताचे चंद्रयान चंद्राच्या भुमीवर उतरणार होते. भारतियांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. चंद्रयान 2 च्या चंद्रस्पर्शाची वेळ जवळ आली होती. या ऐतिहासिक आणि अभूतपर्व घटणेचे साक्षीदार होण्यासाठी देशासह जगही आतुर होते.

हा प्रेरणा देणारा क्षण प्रत्येक भारतीय होण्याचा गर्व आणि प्रत्येकाच्यात देश प्रेम निर्माण करत होता. हि मोहिमेसाठी स्वता भारताचे पंतप्रधान मा. नरेद्र मोदी इसरो च्या केद्रात उपस्थीत होते. यामुळे संशोधकांसह भारतियांचा उत्साह वाढला होता. विक्रम नावाचे लँडर अन् आणि प्रग्यान नावाचे रॉवर उतरणार होते. चंद्रयानाचे विक्रम लँडर सकाळीपासुनच चंद्राभोवती कक्षा कमी करत चंद्राच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करित होते. या सर्व मोहिमेत सॉफ्ट लँडींग करुन नवा इतिहास रचणार होते. 

रात्री 1:45 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर उतरण्यात सुरुवात केली संपुर्ण देशासह जगाच्या नजरा आपल्या मोहिमेवर लागल्या होत्या. चंद्राच्या पृष्टाभागाचे यानाचे अंतर जस जसे कमी होत होते. तसे सगळ्यांची धाकधुक वाढली होती. इसरो मधील संशोधक विक्रम लँडर च्या मार्गक्रमावर बारीक लक्ष ठेउन होते. 1:53 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडींग करणार होते.

इसरो चे अध्यक्ष के. सिवन यांनी याला शेवटच्या 15 मिनिटाचा थरार असे संबोधले होते. सगळे सुरळित चालु होते. विक्रम लँडिग करण्यासाठी 2.1km वर त्याचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. कोणाला काहिच कळत नव्हत. संशोधकांच्या चेहऱ्यावर तनाव स्पष्ट जाणवत होता. त्यानंतर डॉ. के सिवन यांनी सांगितले कि संपर्क तुटला आहे. चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या आर्बिटर पासुन जो डाटा मिळत आहे. त्याचे विष्लेशन करत आहोत.

हे सांगताना त्यांच्याही चेहर्यावर तनाव स्पष्ट जाणवत होता. संपुर्ण इसरो सह देश शांत झाला होता. पण जे केले ते मोठ्या चमत्कारापेक्षाही कमी नव्हते. सपर्क तुटला होता. पण मोहिम सुरुच होती. इसरो च्या कार्यालयात शांतता पसरली होती पण तेथे उपस्थीत असलेल्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी संशोधकांना धीर दिला. 

इसरो च्या सेंटर मधुन पंतप्रधानांनी संपुर्ण देशाला संबोधीत केले अन् ते म्हणाले विज्ञानात अपयश नसतेच असतो तो केवळ प्रयोग. जे तुम्ही करुन दाखवले त्याचा देशाला सार्थ अभिमान आहे. कधीही हार न माणणार्या संसकृतीचे जतन केले आहे. ते म्हणाले मी तूमच्या सोबत आहे अन् संपुर्ण देश तुमच्या बरोबर आहे. निराश होउु नका भारतीय संशोधनाचे देशासाठी अमुल्य योगदान आहे.

चंद्रयान 2च्या टिम ने अतोनात परिश्रम घेतले. चंद्रावर जान्याचे स्वप्न अधीक प्रबळ झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान जाताना डॉ. के सिवन भावुक झालेला तो क्षण मन हेलावुन टाकणारा होता. अन् त्या क्षणाला मोदींजींसह संपुर्ण देश हि भावुक झाला. आणि यातुन प्रेरणा घेऊन कितीतरी नविन संशोधक निर्माण होतील. संपुर्ण देश संशोधकांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला.

फक्त संपर्क तुटला आहे, चंद्रावर उतरण्याची जिद्द अजुनही तिच आहे. अमेरिकेच्या नासा ने हि भारतिय इसरो च्या संशोधकांचे कौतुक केले. ऑरबिटर अजुन हि चंद्रप्रदक्षीना घालतोय. व नीट काम करतोय. काहि तासातच ऑर्बिटर ने लँडर चाही शोध लावला. त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अजुनही सुरु आहेत. चंद्रयान मोहिमेच्या आज प्रत्येक भारतियाला गर्व आहे. सगळ्या इसरो च्या टिमच अभिनंदन…

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News